Fraud News : उद्योजकाची २७ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा

लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे १० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका उद्योजकाची २७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
Fraud News
Fraud News : उद्योजकाची २७ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा(File Photo)
Published on
Updated on

Fraud News: Businessman defrauded of 27 lakhs; case registered against three people

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे १० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका उद्योजकाची २७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २० जून २०२४ ते २ जानेवारी २०२६ या काळात छावणी भागात घडला. अनुप राजकिशोर शक्य (रा. गोवा), रश्मी अनुप शक्य आणि विक्रांतसिंग गंगारामसिंग कुशवाहा (दोघे रा. उत्तरप्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत.

Fraud News
छत्रपती संभाजीनगर येथील 'इंदिरा आयव्हीएफ'मध्ये आता प्रगत एलआयटी आणि मायक्रो-टीसे तंत्रज्ञान

फिर्यादी मुक्तार युसुफ शेख (५३, रा. चिनार गार्डन, पडेगाव) हे ग्लोबल व्हिजन इकोग्रीन इन्फ्राटेक प्रा. लि. या कंपनीद्वारे इलेक्ट्रिकल गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून भागीदार प्रकाश देवचंद राठोड (रा. देशपांडेपूरम) यांच्यासोबत मिळून व्यवसाय करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, पुणे येथील जीभेष पांडा यांच्या मध्यस्थीने आरोपी अनुप शक्य आणि त्याचे सीओ विक्रांतसिंग कुशवाह सोबत वर्षभरापूर्वी ओळख झाली. आरोपींनी आपण इलाईट जी. के. इन्फ्रा प्रा. लि. या कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवले.

४ कोटी ५० लाख प्रति मेगावॅट प्रमाणे कामासाठी आर ोपींनी शेख यांना ईएमडी अनामत रक्कम म्हणून ३८ लाख ७९ हजार रुपये भरण्यास सांगितले. २० जून २०२४ रोजी आरोपींनी त्यांना गोवा येथील कार्यालयात बोलाविले. गोव्यातील एका बँकेत ऑनलाइन पद्धतीने शेख यांनी रक्कम जमा केली होती.

Fraud News
महापालिकेच्या आखाड्यात शिवसेनेचे सर्वाधिक उमेदवार

पैसे भरल्यानंतर आरोपींनी कामाचे आदेश दिले नाहीत आणि कामाची साईटही दाखवली नाही. त्यानंतर उदगीरऐवजी अकोला येथील साईट दाखवली. मात्र, काम सुरू करण्यासाठी वारंवार तारखेवर तारीख देऊन टाळाटाळ करू लागले. जुलै २०२४ रोजी पुणे येथील शक्यच्या कार्यालयात संपर्क केल्यावर तिघे आरोपी आफ्रिकेत दौऱ्यावर असलयाचे समजले. त्यानंतर करारानुसार तीन महिने उलटून गेल्याने अनामत रक्कम परत करा किंवा काम द्या, अशी मागणी करून प्रतिसाद येत नव्हता.

धनादेश झाले बाउंस

वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आरोपींनी शेख यांना काही धनादेश दिले. शेख यांनी ते वटवण्यासाठी टाकले असता, आरोपींनी पेमेंट स्टॉप केल्यामुळे ते अनादरित झाले. आरोपींनी वकील पत्राद्वारे उत्तर देऊन मुदत मागितली आणि एकूण रकमेपैकी केवळ ११ लाख २९ हजार रुपये परत केले.

खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी

उर्वरित २७ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली असता, आरोपींनी शेख यांनाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेख यांनी छावणी ठाण्यात धाव घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news