

Yashawant Chavan Centre Yuva Purskar 2024-25
छत्रपती संभाजीनगर : यशवंतराव चव्हाण सेंटरच्यावतीने राज्यस्तरीय युवा पुरस्कार 2024-25 जाहीर करण्यात आले आहे. 30 मे रोजी छत्रपती संभाजी नगरमधील रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर येथे सकाळी साडे नऊ वाजता हा सोहळा पार पडणार असून महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
गेल्या 26 वर्षांपासून यशवंतराव चव्हाण सेंटरच्यावतीने महाराष्ट्राच्या सर्वागीण विकासासाठी विविध क्षेत्रात विधायक, भरीव व विशेष कामगिरी करणाऱ्या युवक-युवतींना हे पुरस्कार देण्यात येतात.
यंदा पुरस्काराचे मानकरी कोण?
साहित्य - विनायक होगाडे (कोल्हापूर), मृदगंधा दीक्षित (पुणे),
सामाजिक – आकाश टाले (नागपूर), ऋतुजा जेवे (बुलढाणा),
इनोव्हेटर – सुश्रुत पाटील (पालघर), पद्मजा राजगुरू (परभणी),
क्रीडा – ओजस देवतळे, नागपूर (क्रीडा प्रकार : धनुर्विद्या), हृतिका श्रीराम, सोलापूर (डायव्हिंग)
पत्रकारिता – प्रथमेश पाटील (पुणे) ज्योती वाय. एल. (मुंबई)
उद्योजक - जयेश टोपे (नाशिक) शिवानी सोनवणे (पुणे)
रंगमंचीय कलाविष्कार विभाग- कृष्णाई उळेकर, धाराशिव (लोककला), तन्वी पालव, सिंधुदुर्ग (शास्त्रीय नृत्य), ऋतुजा सोनवणे, जळगाव (शास्त्रीय संगीत), कल्पेश समेळ, रायगड (नाट्य)
पुरस्काराचे स्वरुप आणि प्रक्रिया काय?
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येते. २१ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यंदाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम असतील, तर मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.