

Workers should be ready for the elections: MLA Abdul Sattar
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना सिल्लोड येथे शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ माजी मंत्री व आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शक्तिप्रदर्शनासह करण्यात आला. यावेळी आमदार अब्दुल सत्तार म्हणाले, निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील, त्यामुळे प्रत्येक कार्यकत्यनि सज्ज राहावे.
शिवसेना भवन परिसरात उभारलेल्या भव्य डोममध्ये झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला, युवा व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. आमदार अब्दुल सत्तार म्हणाले संघटनेचा पाया सामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उभा असतो. प्रत्येक पदाधिकारी व कार्यकत्यनि स्वतःला उमेदवार समजून कामाला लागावे. फ्फ ङ्गङ्घनगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये प्रत्येक बूथ, प्रभाग आणि गटगणावर विजय मिळवणे हेच आपले ध्येय आहे. सिल्लोडच्या राजकारणात आगामी निवडणुकांसाठी नव्या जोमाची सुरुवात या मेळाव्याने केली आहे असे विचार यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष अर्जुन पा. गाढे, सूतगिरणीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, तालुकाप्रमुख केशवराव तायडे, शहरप्रमुख मनोज झवर, सभापती विश्वासराव दाभाडे, जि.प.चे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, सत्तार बागवान, गजानन महाजन, रऊफ बागवान, गणेश पा. ढोरमारे, आसिफ बागवान, प्रभारी महिला आघाडीच्या पुष्पाताई गव्हाणे, दुर्गा पवार, मेघा शहा तसेच अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रचार शुभारंभाचे प्रस्ताविक नंदकिशोर सहारे यांनी केले, सूत्रसंचालन सुदर्शन अग्रवाल यांनी केले तर आभार संदीप राऊत व दारासिंग चव्हाण यांनी मानले.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. लवकरच कर्जमाफीची घोषणा होईल आणि पीकविमा संदर्भात अन्याय होऊ देणार नाही. तसेच सर्व धर्मीयांमध्ये ऐक्य राखण्याचे आवाहन करत, आपण विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवतो, असे आमदार सत्तार त्यांनी यावेळी नमूद केले.