Sambhajinagar News : तनवाणी, घोडेले, तुपे यांच्याकडे नव्या जबाबदाऱ्या

महापालिका, जि. प. निवडणुकीआधी शिवसेनेकडून नवीन नियुक्त्या जाहीर
Chhatrapati Sambhajinagar
Sambhajinagar News : तनवाणी, घोडेले, तुपे यांच्याकडे नव्या जबाबदाऱ्या File Photo
Published on
Updated on

Municipal Corporation, Panchyat elections before New appointments announced by Shiv Sena

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी शिवसेनेकडून जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, माजी आमदार किशनचंद तनवाणी, कैलास पाटील, अण्णासाहेब माने, माजी महापौर नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे यांना नवीन जबाबदारी मिळाली आहे. तनवाणी हे विधानसभा निवडणुकीवेळी शिव-सेनेत दाखल झाले होते. मात्र आतापर्यंत त्यांच्याकडे कोणतेही पद देण्यात आले नव्हते. आता त्यांची प्रभारी लोकसभा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Diwali Shopping : दिवाळीच्या खरेदीला सुरुवात, बाजारात चैतन्य

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग झाले. मात्र आतापर्यंत त्यातील अनेकांना कोणतेही पद मिळाले नव्हते. आता महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने रविवारी शहर आणि जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या.

यात छत्रपती संभाजीनगरच्या प्रभारी लोकसभा प्रमुखपदी किशनचंद तनवाणी, फुलंब्रीच्या सहसंपर्कप्रमुखपदी त्र्यंबक तुपे, वैजापूरच्या सहसंपर्कप्रमुखपदी अण्णासाहेब माने, गंगापूरच्या सहसंपर्कप्रमुखपदी कैलास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. यासोबतच महापालिका निवडणुकीसाठी एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात सदस्य म्हणून जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, विकास जैन, किशनचंद तनवाणी, ऋग्रीकेश जैस्वाल यांचा समावेश आहे. शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीने हे नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.

Chhatrapati Sambhajinagar
Sambhajinagar Water Supply : शहराची २४ वर्षांची प्रतीक्षा संपणार, २५०० च्या जलवाहिनीतून डिसेंबरमध्ये पाणीपुरवठा

ग्रामीणचे जिल्हाप्रमुख बदलले जिल्ह्यात शिवसेनेचे तीन जिल्हाप्रमुख आहेत. यावेळी ग्रामीणचे एक जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत यांना बदलण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर वाबासाहेब जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर भरतसिंग राज-पूत यांच्याकडे जिल्हा संघटक अशी नवीन जबाबदारी दिली गेली आहे. आता बाबासाहेब जगताप, आमदार विलास भुमरे आणि राजेंद्र जंजाळ हे तीन जिल्हाप्रमुख असणार आहेत.

तनवाणी, तुपेंना जिल्हाप्रमुखपदाची हुलकावणी

किशनचंद तनवाणी आणि त्र्यंबक तुपे यापैकी एकाची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती होईल, अशी चर्चा काही दिवसांपासून रंगली होती. त्यादृष्टीने लॉबिंगही झाल्याचे बोलले जाते. मात्र तनवाणी आणि तुपे या दोघांनाही जिल्हाप्रमुखपदाने हुलकावणी दिली. तुपे याआधी शिवसेना उबाठा पक्षात असताना संपूर्ण जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख होते. आता त्यांच्याकडे केवळ फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या सहसंपर्कप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news