Workers Safety : अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे कामगारांची सुरक्षा अधिक 'भक्कम' !

सेफ्टी फर्स्टचे पालन; कंपन्यांमधील अपघातांचे प्रमाण ९० ते ९५ टक्क्यांनी घटले
Workers Safety
Workers Safety : अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे कामगारांची सुरक्षा अधिक 'भक्कम' !file photo
Published on: 
Updated on: 

Workers' safety is 'stronger' thanks to New technology

छत्रपती संभाजीनगर : आशिया खंडात अतिशय झपाट्याने औद्योगिक विस्तार झालेल्या छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये एकेकाळी कारखान्यांतील अपघातांचे सत्र चिंताजनक होते. यंत्रांमध्ये अडकून कामगारांचे हात निकामी होणे किंवा जीव गमावण्याच्या अनेक दुर्दैवी घटनांनी या औद्योगिक वसाहतीला विळखा घातला होता. मात्र, काळ बदलला तसे तंत्रज्ञानाच्या प्रगत युगात अत्याधुनिक ऑटोमेशन, रोबोटिक यंत्रणा आणि कडक सुरक्षा नियमांमुळे अपघातांचे प्रमाण ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. त्यामुळे कामगारांची सुरक्षा पूर्वपिक्षा अधिक भक्कम झाली आहे.

Workers Safety
air-conditioned e-buses : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३४ वातानुकूलित ई-बसचे लोकार्पण

उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरातील वाळूज, शेंद्रा, बिडकीन ऑरिक सिटी, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा आणि पैठण एमआयडीसीमध्ये हजारो कारखाने अहोरात्र सुरू आहेत. या विशाल औद्योगिक जाळ्यात सुरक्षा व्यवस्था हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. येथे हजारो कामगार कार्यरत असून, त्यांना अनेकदा अपघातांना सामोरे जावे लागले आहे. मागील काही वर्षांत औद्योगिक प्रकल्पांमध्ये अपघातांच्या अनेक घटना समोर आल्या. यंत्रात हात अडकून अपंगत्व येणे किंवा मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

मात्र, अनेक कंपन्यांमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री दाखल झाल्याने गेल्या काही वर्षांत अशा अपघातांमध्ये घट झाल्याचे उद्योजक आणि कामगार संघटनांचे म्हणणे आहे. उद्योगांमध्ये 'सेफ्टी फर्स्ट'चा जागर, वेळोवेळी प्रशिक्षण आणि सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन यामुळे कामगारांसोबतच व्यवस्थापनही सुरक्षेला प्राधान्य देत आहे. यामुळे अपघातांच्या प्रमाणात कमालीची घट झाल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे.

Workers Safety
Drought Relief Fund : राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे एक महिन्याचे वेतन दुष्काळ मदतनिधीस

अपघातग्रस्तांसाठी सर्वसमावेशक मदत आणि विमा दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडल्यास कामगाराला ईएसआयमार्फत मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. तसेच, कंपनीकडून उपचारांचा संपूर्ण खर्चही दिला जातो. कामगाराला अपंगत्व आल्यास नियमानुसार आयुष्यभर पेन्शन, तर दुर्दैवी मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना आर्थिक मदत, विम्याची रक्कम आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची संवेदनशीलता आता उद्योगांमध्ये रूजत आहे.

रोबोटिक यंत्रणा, सेफ्टी गार्डचे कवच 66 अनेक कंपन्यांमध्ये ऑटोमेशन आणि रोबोटिक यंत्रणा दाखल झाल्या आहेत. 'सेफ्टी गार्ड शिवाय मशीन सुरू होत नाही. कामगारांनी सुरक्षा यंत्रणा बायपास करण्याचा प्रयत्न केला तरी तो निष्फळ ठरतो. कोणतीही त्रुटी आढळल्यास यंत्रे तातडीने बंद होतात. त्यामुळे कामगारांवरील कामाचा ताण कमी झाला आहे. परिणामी, अपघातांचे प्रमाण ९० ते ९५ टक्क्यांनी कमी होऊन कामगार अधिक सुरक्षित झाला आहे. याशिवाय, वेळोवेळी कामगारांचे प्रशिक्षण आणि जनजागृतीही केली जाते.
- मिहीर सौन्दलगेकर, उपाध्यक्ष, सीएमआयए
परिस्थिती बदलली, सुरक्षेला प्राधान्य एकेकाळी कामगार सुरक्षेचे नियम पायदळी तुडवणाऱ्या कंपन्यांविरोधात लढा द्यावा लागायचा. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. आज कंपन्या स्वतःहून कामगारांना सेफ्टी गार्ड, गॉगल, ग्लोव्हज, हेल्मेट आणि कॉटनचे सेफ्टी ड्रेस उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे.
- प्रभाकर मते पाटील, कामगार नेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.