Drought Relief Fund : राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे एक महिन्याचे वेतन दुष्काळ मदतनिधीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले असता त्यांनी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या निवासस्थानी भेट दिली.
Drought Relief Fund
Drought Relief Fund : राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे एक महिन्याचे वेतन दुष्काळ मदतनिधीसfile photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांप्रती बांधिलकी जपत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस आपले एक महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी रविवारी (दि. १) मदतीचा धनादेश सुपूर्द केला.

Drought Relief Fund
Diwali 2026 : बोनस मिळाला, पगार झाला! बाजारपेठेत उत्साह

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले असता त्यांनी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी बागडे यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एक महिन्याच्या वेतनाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मदतीचा स्वीकार केला.

Drought Relief Fund
air-conditioned e-buses : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३४ वातानुकूलित ई-बसचे लोकार्पण

या वेळी इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, आमदार सुहास शिरसाट, आमदार अनुराधा चव्हाण, महापौर समीर राजूरकर, माजी खासदार डॉ. भागवत कराड, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.