air-conditioned e-buses : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३४ वातानुकूलित ई-बसचे लोकार्पण

चार्जिंग स्टेशन, सौरऊर्जा प्रकल्पासह मिटमिटा शाळेच्या इमारतीचेही उद्घाटन
air-conditioned e-buses
air-conditioned e-buses : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३४ वातानुकूलित ई-बसचे लोकार्पणfile photo
Published on: 
Updated on: 

34 air-conditioned e-buses inaugurated by the Chief Minister

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आरामदायी आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी महापालिका व औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध करण्यात आलेल्या ३४ वातानुकूलित इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण रविवारी (दि. १) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ईव्ही चार्जिंग स्टेशन, सौरऊर्जा प्रकल्प आणि मिटमिटा येथील आधुनिक शाळेच्या नवीन इमारतीचेही विभागीय क्रीडा संकुलातून लोकार्पण करण्यात आले. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महापालिकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ७२ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.

air-conditioned e-buses
CM Devendra Fadnavis : शासन बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या शहर बस ताफ्यात ३४ वातानुकूलित बसची भर पडली आहे. या बसचे रविवारी (दि. १) सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलात लोकार्पण करण्यात आले. नव्याने दाखल झालेल्या ३४ वातानुकूलित ई-बस सोमवारपासून (दि. २) प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

नऊ मीटर लांबीच्या प्रत्येक बसमध्ये ३२ आसनांची व्यवस्था आहे. जीपीएस आधारित बस ट्रॅकिंग, डिजिटल तिकीट प्रणाली, आधुनिक ब्रेकिंग यंत्रणा आणि जलद चार्जिंगची सुविधा या बसमध्ये देण्यात आली आहे.

शहरातील विविध मार्गावर या बस धावणार असून, इलेक्ट्रिक बसमुळे इंधनावरील अवलंबित्व आणि वायुप्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. पीएम ई-बस योजनेअंतर्गत आणखी १०० इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कॅनॉट गार्डन आणि बाबा पेट्रोल पंपाजवळील भगवान महावीर उड्डाणपुलाखाली ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. भविष्यात आणखी दहा ठिकाणी चार्जिंग स्टेशन विकसित करण्यात येणार आहेत.

air-conditioned e-buses
Cyber Fraud : वृद्धाचा मोबाईल हॅक करून सायबर भामट्यांनी उडविले ७ लाख रुपये

सिद्धार्थ उद्यानातील वाहनतळावर १०० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला असून, त्यातून वीजबचत आणि स्वच्छ ऊर्जेच्या वापराला चालना मिळणार आहे. तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या नवीन इमारतीचेही लोकार्पण करण्यात आले. या इमारतीत २४ वर्गखोल्या, ग्रंथालय, संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षण सुविधा, स्मार्ट देण्यात आल्या आहेत.

यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार सुहास शिरसाट, अनुराधा चव्हाण, नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी

दुष्काळग्रस्तांसाठी ७२ लाखांचा निधी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा धनादेश महापौर समीर राजूरकर आणि महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. महापालिकेच्या ३,३०७ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन म्हणून ५९ लाख १४ हजार ९०२ रुपये, तर ११९ नगरसेवकांच्या एका महिन्याच्या मानधनापोटी ११ लाख ९० हजार रुपये, असा सुमारे ७२ लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे प्रदान करण्यात आला.

आणखी १०० ई-बस सुरू करण्याचे नियोजन

महापालिकेच्या पीएम ई-बस योजनेअंतर्गत शहरात आणखी १०० इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचे नियोजन आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी सध्या दोन ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले असून, भविष्यात आणखी दहा ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.