Crime News : रिक्षाच्या भाड्यावरून कामगारांमध्ये हाणामारी

मारहाणीचे प्रकार वाढले; पोलिसांनी गस्त वाढवावी
Crime News
Crime News : रिक्षाच्या भाड्यावरून कामगारांमध्ये हाणामारीfile photo
Published on: 
Updated on: 

Workers clash over rickshaw fare

बिडकीन, पुढारी वृत्तसेवा : डीएमआयसीमध्ये औद्योगिक बिडकीन परिसरातील विकासाचा वेग वाढत असताना कामगारांमधील वाद आणि मारहाणीच्या घटनाही वाढत आहेत. गेल्या आठवडाभरात वादातून तीन घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी (दि. २५) सायंकाळी रिक्षाच्या भाड्यावरून कामगारांमध्ये वाद होऊन मारहाण झाली. वाढत्या घटनांमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Crime News
Kite Manja : मांजाने चिमुरड्याचा गळा चिरला; उपचारासाठी रुग्णालयांची वणवण

बिडकीन डीएमआयसीमध्ये सध्या ३३ लहान-मोठ्या कंपन्यांचे बांधकाम सुरू असून, कामगारांची संख्या वाढत आहे. दर रविवारी पगार मिळत असल्याने कामगार रेशन, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बिडकीन, चित्तेगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे गर्दी करतात.

त्यामुळे बाजारपेठांतील वर्दळही वाढते. २० ऑक्टोबर रोजी कामगारांमधील वादातून एकाने दुसऱ्याच्या पोटात चाकूने वार केला. त्यानंतर स्वतः वरही वार केल्याने दोघे जखमी झाले शनिवारी रात्रीही एका कामगारावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची माहिती आहे. संबंधित ठेकेदाराने दोन्ही कामगारांना कंपनीच्या परिसरात परत नेल्याचे सांगितले जाते.

Crime News
Sambhajinagar News : पदाधिकाऱ्यांच्या दालनांसाठी हिरकणी कक्षावर हातोडा ?

कायदा, सुव्यवस्था राखण्याचे आव्हान

औद्योगिकीकरणामुळे कामगारांची वर्दळ आणि लोकसंख्या वाढत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. पोलिस मनुष्यबळावरील ताण लक्षात घेता बाजारपेठा, मुख्य रस्ते आणि कामगारांची गर्दी असलेल्या भागांत नियमित गस्त वाढविण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news