Kite Manja : मांजाने चिमुरड्याचा गळा चिरला; उपचारासाठी रुग्णालयांची वणवण

वाळूजमध्ये आपत्कालीन आरोग्य सुविधांवर प्रश्नचिन्ह
Kite Manja
Kite Manja : मांजाने चिमुरड्याचा गळा चिरला; उपचारासाठी रुग्णालयांची वणवणfile photo
Published on: 
Updated on: 

A kite string slit the little child's throat; Question marks on emergency health facilities in Walaj

वाळूज, पुढारी वृत्तसेवा : पतंगाच्या धारदार मांजाने आठ वर्षांच्या धनंजय बारकू अहिरे या बालकाचा गळा चिरल्याची घटना रविवारी (दि. २५) सकाळी अकराच्या सुमारास वाळूज येथील लायननगरात घडली. गळ्याला गंभीर दुखापत झालेल्या बालकाला उपचारासाठी तीन रुग्णालयांत नेल्यानंतर सुमारे ३५ किलोमीटर अंतरावरील गंगापूर येथे न्यावे लागले. या घटनेमुळे परिसरातील आपत्कालीन आरोग्य सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Kite Manja
Literacy Test : ७३ वर्षांच्या रमा आजींनी दिली साक्षरतेची परीक्षा

जखमी धनंजयला पालकांनी प्रथम वाळूजमधील खासगी रुग्णालयात नेले. तेथे उपचार न झाल्याने त्याला सीएसएमएस रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान बालक सहकार्य करीत नसल्याचे डॉ. राजेंद्र प्रधान यांनी सांगितल्याची माहिती आहे. त्यानंतर पालकांनी त्याला गंगापूर येथील खासगी रुग्णालयात नेले. तेथेही टाके घालण्यात अडचण आल्याने जखमेवर पट्टी करण्यात आल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

आपत्कालीन परिस्थितीत बालकाला वेळेत योग्य उपचार मिळण्यासाठी पालकांना रुग्णालये का बदलावी लागली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वीही कुत्रा चावलेल्या ६५ वर्षीय व्यक्तीला उपचारासाठी सुमारे ३५ किलोमीटरचा प्रवास करावा लागल्याची घटना समोर आली होती. दरम्यान, या घटनेबाबत वाळूज पोलिस ठाण्यात कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Kite Manja
Congress protests : मतदारयादीतील गोंधळाविरोधात काँग्रेसची निदर्शने; चौकशीची मागणी

धोकादायक मांजावर नियंत्रणाची गरज

धारदार मांजामुळे लहान मुले आणि दुचाकीस्वारांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे धोकादायक मांजाची विक्री व वापर रोखण्यासाठी जनजागृती आणि प्रभावी कारवाई करण्याची गरज आहे. तसेच आपत्कालीन रुग्णांसाठी स्थानिक रुग्णालयांत उपलब्ध सुविधा आणि पुढील उपचारांसाठीच्या व्यवस्थेबाबत स्पष्टता असणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news