छत्रपती संभाजीनगर : विद्युत मोटर जोडताना विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : विद्युत मोटर जोडताना विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

कन्नड; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील औराळा तांडा (पारसवाडी तांडा) येथे पाणी भरण्यासाठी विद्युत मोटर सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.३१) सकाळी आकराच्या सुमारास घडली. मनिषा भगवान राठोड (वय ३०) असे या महिलेचे नाव आहे.

याबाबतअधिक माहिती अशी की, मनिषाने सकाळी नळाचे पाणी भरण्यासाठी घरातील विदयुत मोटर नळाला जोडू लागली. घाईघाईने मोटर जोडत असताना विदयुत प्रवाह मोटरीत उतरल्याने त्यांना जोराचा विजेचा धक्का बसला. ही बाब शेजारच्या लोकाच्या लक्षात येताच त्यांनी त्यांना तातडीने औराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पळविले. मात्र त्यांची तब्येत खूपच खालावली असल्याने तेथील डॉक्टरांनी त्यांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना तेथील रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात अकस्मात मुत्युची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news