संभाजीनगरचा 23 वा महापौर कोण ? भाजपमधून जोरदार लॉबिंग

खुल्या प्रवर्गामुळे १२ इच्छुक
Who will be Sambhaji Nagar's 23rd mayor?
संभाजीनगरचा 23 वा महापौर कोण ? भाजपमधून जोरदार लॉबिंगpudhari photo
Published on
Updated on

Who will be Sambhaji Nagar's 23rd mayor? Intense lobbying is underway from the BJP.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर गुरुवारी मुंबईत ही सोडत प्रक्रिया पूर्ण झाली असून यात छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे महापौरपद हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. भाजप बहुमतापासून केवळ एक पाऊल मागे असल्याने पक्षातून महापौर पदासाठी तब्बल १२ नगरसेवक गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत. त्यातील अनेकांनी लॉबिंग देखील सुरू केल्याची चर्चा आहे. येत्या दोन दिवसांत पक्षाची बैठक होणार आहे. त्यात इच्छुकांच्या नावाची यादी तयार करून प्रदेशाध्यक्षांकडे पाठविली जाणार असल्याने भाजपकडून २३ व्या महापौर पदासाठी कोणाचे नाव निश्चित होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Who will be Sambhaji Nagar's 23rd mayor?
Accident News : कान्होबा दर्शनासाठी निघालेल्या तरुणावर काळाचा घाला

महापालिकेच्या निवडणुका दहा वर्षांनंतर झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक नगरसेवक सध्या महापालिकेत जाण्यासाठी अतूर झाले आहेत. त्यात यंदा भाजपकडेच सर्वाधिक नगरसेवक असून त्यांनी सत्ता स्थापन्यासाठी तयारी सुरू केली आहे. शिवसेनेसोबत युतीत सत्ता स्थापन करणार असल्याचे यापूर्वीच ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी सांगितले आहेत. त्यामुळे केवळ महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडेच भाजपचे लक्ष होते. बुधवारी मुंबईत नगरविकास विभागाचे राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत प्रक्रिया पार पडली. त्यात खुल्या प्रवर्गासाठी संभाजीनगरचे महापौरपद आरक्षित करण्यात आले आहे. या सोडतीची घोषणा होताच भाजपमधून महापौर पदासाठी इच्छुक असलेले अनिल मकरिये, महेश माळवतकर, राजू वैद्य, समीर राजूरकर, विजय औताडे, आप्पासाहेव हिवाळे, शिवाजी दांडगे, राज वानखेडे, सुरेंद्र कुलकर्णी, रामेश्वर भादवे यांच्यासह महिला नगरसेविका सविता कुलकर्णी, अॅड. माधुरी अदवंत यांचाही समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्याचे निवडणूकप्रमुख तथा ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे हे सर्व इच्छुकांची बैठक घेऊन त्यांच्या नावांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सादर करणार आहेत. त्यांच्या आदेशानंतरच महापौर पदासाठी उमेदवाराचे नाव निश्चित होणार आहे.

आतापर्यंतचे आरक्षण सोडत

१९९५ साली महिलांसाठी राखीव, तर १९९६ साली सर्वसाधारण (खुला), १९९७ साली अनुसूचित जमाती (एस.टी.), १९९८ साली ओबीसी (महिला), १९९९ साली सर्वसाधारण (खुला), २००० ते २००२ साली ओबीसी, २००० ते २००५ साली महिलांसाठी राखीव, २००५ ते २००७ साली सर्वसाधारण (खुला), २००७ ते २०१० साली सर्वसाधारण (खुला), २०१० ते २०१२ साली ओबीसी (महिला), २०१२ ते २०१५ साली महिलांसाठी राखीव, २०१५ ते २०१७ साली सर्वसाधारण (खुला), २०१७ ते २०२० साली ओबीसी, पाच वर्षे प्रशासक आणि आता जानेवारी २०२६ साठी खुला प्रवर्ग

Who will be Sambhaji Nagar's 23rd mayor?
साडेतीन महिने लढा देत चिमुकल्याची गंभीर आजारावर मात

महापौर पूर्व मतदार संघाचाच

भाजपकडे पूर्व आणि फुलंब्री मतदारसंघ आहेत. त्यामुळे या दोन मतदार संघांतूनच महापौर पदाच्या उमेदवाराची निवड होईल, अशी देखील चर्चा आहे. परंतु, यंदा मध्य आणि पश्चिममध्येही ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वात भाजपला सर्वाधिक यश मिळाल्याने या मतदारसंघाचा देखील विचार होईल, असेही बोलले जात आहे.

इच्छुकांची नावे प्रदेशाध्यक्षांकडे पाठवणार महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी 66 सुटले आहेत. भाजपकडे सुमारे १२ हून अधिक इच्छुक आहेत. त्यामुळे कोअर कमिटीच्या बैठकीत प्रत्येक इच्छुकांची नावांवर चर्चा होईल. त्यानंतर ही यादी प्रदेशाध्यक्षांकडे सादर केली जाईल. प्रदेशाध्यक्षांकडे महापौर पदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित होईल.
- किशोर शितोळे, शहर जिल्हाध्यक्ष भाजप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news