साडेतीन महिने लढा देत चिमुकल्याची गंभीर आजारावर मात

वय अवघे २.५ वर्ष. त्यात जीबीएससारखा गंभीर आजार झाल्याने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक-दोन दिवस नव्हे तर साडेतीन महिने या आजाराशी यशस्वी लढा देत हा चिमुकला ठणठणीत बरा झाला.
sambhajinagar news
साडेतीन महिने लढा देत चिमुकल्याची गंभीर आजारावर मातFile Photo
Published on
Updated on

After fighting for three and a half months, the child overcame the serious illness

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वय अवघे २.५ वर्ष. त्यात जीबीएससारखा गंभीर आजार झाल्याने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक-दोन दिवस नव्हे तर साडेतीन महिने या आजाराशी यशस्वी लढा देत हा चिमुकला ठणठणीत बरा झाला. डॉक्टरांच्या उपचाराच्या बळावर त्याने आजारावर मात केली. बुधवारी (दि.२१) त्याची रुग्णालयातून सुट्टी झाल्याने नातेवाईकांच्या आनंदासमोर आकाश ठेंगणे पडल्याचे चित्र होते.

sambhajinagar news
छत्रपती संभाजीनगर, परभणीचे महापौरपद खुल्या गटाकडे

हिंगोली जिल्ह्यातील या अडीच वर्षीय चिमुकल्यास ७ ऑक्टोबर २०२५ रोजी घाटी रुग्णालयातील बालरोग विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जीवीएस आजार झाल्याने त्याचे नातेवाईक चिंताग्रस्त बनले होते. घाटीत दाखल होण्यापूर्वी पालकांचे सुमारे १० लाख रुपये खर्च झाला होता.

घाटीतील बालरोग अतिदक्षता विभागात या चिमुकल्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखर-खीखाली उपचार सुरु करण्यात आले. आवश्यक सर्व काळजी घेण्यात आली. दीर्घकाळ चाललेल्या उपचारानंतर त्याच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत गेली. अखेर बुधवारी त्याला पूर्णपणे स्थिर अवस्थेत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

sambhajinagar news
Accident News : कान्होबा दर्शनासाठी निघालेल्या तरुणावर काळाचा घाला

घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख व पथकप्रमुख डॉ. प्रभा खैरे-मोरे, सहयोगी प्राध्यापक डॉ. शिल्पा पवार, सहायक प्राध्यापक डॉ. अभिषेक जैन, निवासी डॉक्टर आणि उषा पवार, हमिदा व पीआयसीयूच्या नर्सिंग स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले. चिमुकल्याच्या या यशस्वी बरे होण्यामुळे त्याचे कुटुंबीय, नातेवाईकांसह विभागातील डॉक्टर्स व स्टाफच्या चेहऱ्यावरही आनंद झळकत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news