Sambhajinagar News : नगरसेवक नावंदर, स्वामी यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई कधी?

इम्तियाज जलील यांचा आयुक्तांना सवाल : अवैध बांधकामाची कागदपत्रे केली सादर
Sambhajinagar News
Sambhajinagar News : नगरसेवक नावंदर, स्वामी यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई कधी?file photo
Published on
Updated on

When will action be taken against the unauthorized constructions by Corporators Navandar and Swami?

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नगर-सेवक मतीन शेख यांच्या अनधिकृत मालमत्तांवर महापालिकेकडून बुलडोजर कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या कथित अनधिकृत बांधकामांचाही मुद्दा पुढे आला आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी ३३ नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसह बुधवारी (दि.१३) दुपारी महापालिका आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेत भाजप नगरसेवक गणेश नावंदर आणि विश्वनाथ स्वामी यांच्या बांधकामांबाबत कागदपत्रे सादर करून यावर कारवाई कधी असा सवाल उपस्थितीत केला.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : नगरसेवक मतीनचे अनधिकृत घर, कार्यालय जमीनदोस्त

नारेगाव परिसरातील मतीन शेख यांच्या दोन घरांसह कार्यालयाच्या इमारतीवर बुधवारी पहाटे मोठ्या पोलिस बंदोबस्तात महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईला एमआयएमने विरोध केला नसल्याचे स्पष्ट करत जलील यांनी, अनधिकृत बांधकामांवर कारवाई झालीच पाहिजे, मात्र ती सर्वांवर समान निकषांवर व्हायला हवी, अशी भूमिका मांडली.

यावेळी प्रभाग क्रमांक ११ मधील भाजप नगरसेवक गणेश नावंदर आणि विश्वनाथ स्वामी यांनी नाल्यावर अतिक्रमण करून तसेच मनपाची परवानगी न घेता बहुमजली बांधकाम केल्याचा आरोप जलील यांनी केला. या संदर्भातील अहवाल झोन कार्यालयाच्या सहायक आयुक्तांसह नगररचना विभाग आणि अतिक्रमण विभागाने सादर केल्याचे त्यांनी सांगितले.

यासंदर्भातील अहवाल ३० मार्च २०२६ रोजी सादर झाला आहे. त्याला दीड महिना उलटला तरी कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, या प्रकरणात राज्य निवडणूक आयोगाकडेही तक्रार करण्यात आल्याचे जलील यांनी सांगितले. तसेच सिडकोच्या शॉपलेट प्लॉटवर परवानगीशिवाय तीन मजली इमारत उभारण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar conversion case : नगरसेवक मतीन शेखच्या नोटीसची मुदत आज संपणार

तर निश्चित कारवाई केली जाईल...

नारेगाव येथील एमआयएम नगरसेवक मतीन शेख यांच्या मालमत्तांवरील कारवाईनंतर सत्ताधारी भाजप नगरसेवक गणेश नावंदर आणि विश्वनाथ स्वामी यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी जलील यांनी केली. यावर मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित कागदपत्रांची तपासणी करून नियमबाह्य बांधकाम आढळल्यास निश्चित कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news