Sambhajinagar News : नगरसेवक मतीनचे अनधिकृत घर, कार्यालय जमीनदोस्त

नारेगावात मनपाची कारवाई, एमआयएमसोबतच इतर नगरसेवकही रडारवर
Sambhajinagar News : नगरसेवक मतीनचे अनधिकृत घर, कार्यालय जमीनदोस्त
Published on
Updated on

Corporator Matin's Unauthorized House and Office Demolished

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नाशिकच्या धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला नारेगाव येथे आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन शेख यांच्या अनधिकृत घर, दुकानांसह कार्यालय बुधवारी (दि. १३) महापालिकेने जेसीबी चालवित जमीनदोस्त केल्या. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासनाने एका नगरसेवकाची अनधिकृत मालमत्ता पाडली असून एमआयएमच नव्हे तर इतर कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकांचे अनधिकृत बांधकाम असेल. तर त्याविरोधात महापालिका अशीच कारवाई करेल, असे महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी बुधवारी (दि. १३) कारवाईनंतर सांगितले. त्यामुळे इतर पक्षाच्या नगरसेवकांचे अनधिकृत बांधकामे महापालिकेच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.

Sambhajinagar News : नगरसेवक मतीनचे अनधिकृत घर, कार्यालय जमीनदोस्त
Sambhajinagar news : निदा खानला आश्रय; एमआयएम नगरसेवकाच्या घरावर बुलडोझर

नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धमाँतर प्रकरणात आरोपी असलेली निदा खान ही महिनाभरापासून फरार होती. पोलिस तिचा राज्यभर शोध घेत होते. परंतु, ती छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव भागात अढळली. १ मेपासून निदा खान ही नारेगावमधील एमआयएम नगरसेवक मतीन शेखच्या दोन मजली घरात राहात होती. याबाबत नाशिक व संभाजीनगर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पथकाने गुरुव ारी (दि. ७) रात्री निदा खानला अटक केली. तसेच मतीन शेखने तिला लपण्यास मदत केल्याने पोलिसांनी त्यालाही या गुन्ह्यात सहआरोपी केले. या घटनेनंतर महापालिका प्रशासनानेही नगरसेवक मतीन शेखचे पाळेमुळे शोधण्यास सुरुवात केली. यात मतीनच्या मालमत्तांचा शोध घेत त्या अधिकृत आहेत की अनधिकृत याचावत माहिती जमा केली.

यात मतीनच्या तिन्ही मालमत्तांपैकी एकाचेही गुठेवारी झाली नसून त्या बेकायदेशीररीत्या बांधण्यात आल्याची माहिती पुढे आली. त्यावरून अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे यांनी ही माहिती आयुक्त येडगे यांना दिली. त्यांच्या आदेशाने अतिक्रमण हटाव पथकाने नगर सेवक मतीन शेखच्या मालमत्तांना नोटीस बजावली. त्यात तीन दिवसांत मालकी हक्काचे कागदपत्रे सादर करण्याची

Sambhajinagar News : नगरसेवक मतीनचे अनधिकृत घर, कार्यालय जमीनदोस्त
Chhatrapati Sambhajinagar news : मतीन शेखच्या घरावर आज चालणार बुलडोझर ?
इतर नगरसेवकांवरही होईल कारवाई महापालिका शहरात रोखण्यावर भर देत आहे. नगरसेवक मतीन शेख यांचे घर, कार्यालयाचे बांधकाम बेकायदा होते. त्यांनी बांधकाम परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळेच महापालिकेने पाडापाडीची कारवाई केली. केवळ एमआयएमच नव्हे तर इतर ज्या पक्षांच्या नगरसेवकांच्या मालमत्तांचे बेकायदा बांधकाम अढळून येईल. त्यावर अशीच कायदेशीर कारवाई महापालिका करेल,
अमोल येडगे, आयुक्त, महापालिका

महापौरांचे नो कमेंट्स

महापालिका प्रशासन त्यांचे काम करीत आहे. त्यामुळे त्यांच्या कामावर बोलणे योग्य नाही, असे म्हणत महापौर समीर राजूरकर यांनी नगरसेवक मतीन शेख यांच्याविरोधात झालेल्या कारवाईवर बोलणे टाळले.

आरोपीला आश्रय देणे चुकीचे

एमआयएम नगरसेवक मतीन शेख याने नाशिकच्या धर्मातर प्रकरणातील आरोपी निदा खानला स्वतःच्या अनधिकृत घरात आश्रय दिला होता. गुन्हेगाराला लपविणेदेखील गुन्हाच आहे. त्यामुळे महापालिकेने जी कारवाई केली ती अतिशय योग्य आहे. अनधिकृत बांधकाम कोणाचेही असो ते पाडलेच पाहिजे. राजेंद्र जंजाळ, उपमहापौर, शिवसेना

मनपाची कायदेशीर कारवाई

महापालिकेने अनधिकृत बांधकामांना नोटीस बजावून कायदेश-रिरीत्या कारवाई केली आहे. त्यामुळे यात अधिक काही बोलण्यासारखे नाही, असे म्हणत स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनीही बोलणे टाळले.

मध्यरात्री इम्तियाज जलील नारेगावात

महापालिका आणि पोलिस अधिकारी संयुक्तरीत्या बैठक घेऊन एमआयएम नगरसेवक मतीन शेख याच्या अनधिकृत मालमत्ता पाडण्याचे नियोजन करीत आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना कुप्णकुण लागली. त्यावरून प्रदेशाध्यक्ष जलील हे आपल्या ३३ नगरसेवकांसह नारेगावात दाखल झारने, मतीनच्या घरी जाऊन त्यांनी नातेवाईकांशी संवाद साधला. तसेच घर पाडले तर आम्ही बांधून देऊ, असे आश्वासन दिले. पहाटेपर्यंत एमआयएमचा जमाव परिसरात कायम असल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, त्यामुळे बुधवारी कारवाई होणार असल्याची शक्यता होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news