Voter List : मतदार यादीमध्ये नेमके काय बदल केले ?
What exactly were the changes made to the voter list?
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांवर नागरिकांनी ७ हजार ५६७ हरकती दाखल केल्या. त्या हरकतींचा निपटारा करून मतदार याद्या अंतिम केल्या जाणार आहेत. परंतु त्यापूर्वी मतदार याद्यात नेमके काय बदल केले, यासंदर्भातील माहिती राज्य निवडणूक आयोगाला सादर करावी लागणार आहे. त्यांच्या मंजुरीनंतरच याद्या अंतिम केल्या जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने तयार केलेल्या २९ प्रभागांच्या प्रभागनिहाय मतदार यादीही तयार केली. याद्या प्रसिद्ध होताच इच्छुकांसह सर्वसामान्यांमध्ये एकच खळबळ उडाली. यात प्रामुख्याने सीमारेषेवरील नावे एकातून दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आल्याचे आढळले. त्यावरून याद्यांवर १४ दिवसात तब्बल ७ हजार ५६७ याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा प्रकार समोर येताच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली.
याद्यांची शहानिशा करण्यासाठी प्रशासक जी. श्रीकांत हे स्वतः रस्त्यावर उतरले. काही प्रभागात जावून त्यांनी मतदारांशी संवाद साधत लिका छत्रपती संभाजीनगर प्रत्यक्षात काय स्थिती आहे, हे जाणून घेतले. त्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांनी सक्त ताकीद देत फेरबदल करण्याच्या सूचना दिल्या. अंतिम यादीत चूक अढळल्यास घरी जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिली. त्यानंतर उपायुक्त विकास नवाळे, अपर्णा थेटे यांच्यासह अन्य काही वरिष्ठ अधिकारीही विविध प्रभागांत जाऊन पाहणी करीत होते.
फेरबदलाची माहिती
चुकून जे मतदार दुसऱ्या प्रभागात गेले, त्यांना परत संबंधित प्रभागांत आणण्याचे काम करण्यात आले. या फेरबदलाची माहिती प्राधिकृत अधिकारी व प्रगणक यांच्याकडून हे कंट्रोल चार्ट प्राप्त होतील. हे चार्ट राज्य निवडणूक आयोगाकडे अपलोड केले जातील. त्यांच्या आदेशानुसार पुढील यादी अंतिम केली जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.

