Sambhajinagar News : बंद जलविद्युत प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी

नवीन पिचिंग निर्माण करण्याची लगीनघाई; विविध विभागांना निधीच नाही
Sambhajinagar News
Sambhajinagar News : बंद जलविद्युत प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टीFile Photo
Published on
Updated on

Wasteful Expenditure of Crores on a Shut-Down Hydroelectric Project

पैठण : जायकवाड धरण परिसरातील जलविद्युत प्रकल्प साडेतीन वर्षांच्या पासून बंद अवस्थेत आहे. असे असताना पाटबंधारे विभागाने या प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करून जुनी पिचिंग असताना नवीन पिचिंग निर्माण करण्याची लगीनघाई सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Sambhajinagar News
लाखो रुपयांचा खर्च करूनही उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट

आशिया खंडातील पहिले मातीचे धरण म्हणून ओळख असलेल्या व मुबलक पाणीसाठा असल्याच्या कारणाने येथील जायकवाडी धरणावर १९७६ पासून जलविद्युत प्रकल्प निर्माण केलेला आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य जपानी बनावटीचे रिवर्ससिबल टर्बाइन १२ मेगावॉट वीजनिर्मिती क्षमतेचा उपकरण काही वर्षांपूर्वी बसविण्यात आलेले आहे.

या प्रकल्पातर्गत वीज निर्मिती झालेलंवर पिचिंगद्वारे गोदा वरी नदीत सोडण्यात आलेलं पाणी पुन्हा धरणात वापस घेण्याच्या उच्च यंत्रणा बसविण्यात आले होते. जायकवाडी धरण पायथ्याशी अस लेला जलविद्युत केंद्र परिसरात बंद असणाऱ्या प्रकल्पाच्या दुरुस्तीवर कोट्यवधींचा खर्च करण्यात आलेला आहे. पुन्हा या प्रकल्पावर खर्च करून हे प्रकल्प सुरू सुरू होण्यासंदर्भात अनिश्चितता कायम असतानाही पिचिंगसाठी ६ कोटी रुपयांची गार्ड वॉल उभारण्यात येत आहे.

ात्र जलविद्युत केंद्राची दुरुस्ती होत नसल्याने व कधी होईल याची शाश्वती नसतानादेखील त्याच्या पायथ्याशी पाटबंधारे विभागाच्या वतीने ६ कोटी रुपये खर्च करून पिचिंगचे काम करण्यात येत आहे. तीन वर्षांपूर्वी सुमारे ७० लाख रुपये खर्चुन करण्यात आलेले पिचिंग धरणातून पाणी सोडल्यानंतर वाहून गेले. गेल्याचा गेल्याचा अहवाल दिल्यामुळे नवीन पिचिंग कामाच्या गुणवत्तेवर पाणी तज्ञांनी प्रश्नचिन्ह उभा केला आहे. जलसंपदा विभागाने सुमारे ६१ कोटी रुपयांच्या १० विविध दुरुस्ती कामे सुरू केले आहे. मात्र, या जलविद्युत प्रकल्पाच्या कामासह धरण परिसरातील कामांमध्ये अनियमितता होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Sambhajinagar News
Jalna News : डिझेलअभावी पाट दुरुस्तीचे काम पडले बंद

धरणाच्या सुरक्षतेसाठी काम गरजेचे

पाटबंधारे विभागाने जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी जलविद्युत प्रकल्पाचे नवीन पिचिंग काम सुरू करण्यात आल्यामुळे. येणाऱ्या पावसाळ्यात धरणातून पाणी सोडण्याची वेळ आल्यास कुठलाही अडथळा येणार नसून पावसाळ्यापूर्वी सुरू असलेले काम सुरक्षित उंचीपर्यंत संपन्न होईल अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिली आहे. तसेच धरण शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी सांगितले की, जलविद्युत केंद्र काही वर्षांपासून बंद आहे. ते कधी सुरू होईल हे सांगता येत नाही. मात्र जे काम सध्या सुरू आहे ते धरणाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सुरू केले असल्याचे स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news