Paithan Body Found | वाळूज येथील कंपनीच्या सुपरवायझरचा मृतदेह पैठण येथील गोदावरी नदीत आढळला

पैठण येथील गोदावरी नदीतील नागघाट परिसरात मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला
Waluj Company Supervisor Body Found
Waluj Company Supervisor Body FoundPudhari
Published on
Updated on

Waluj Company Supervisor Body Found

पैठण : वाळूज एमआयडीसी परिसरातील एस. एस. टूल कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह पैठण येथील गोदावरी नदीतील नागघाट परिसरात पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

मृत व्यक्तीची ओळख दत्तात्रेय सिद्धेश्वर आमकर (वय ४१, रा. एन-४०/५, तोरणागडनगर, सिडको, छत्रपती संभाजीनगर) अशी झाली आहे. ते वाळूज एमआयडीसी येथील एस. एस. टूल कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत होते.

Waluj Company Supervisor Body Found
Paithan Crime | पैठण हादरले : लोखंडी गज, दगडाने ठेचून युवकाचा निर्घृण खून

बुधवारी (दि. १) काही नागरिकांनी नागघाट परिसरात गोदावरी नदीच्या पाण्यावर एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पैठण पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी जमादार अनिल गायकवाड, राजेश आटोळे, विलास राऊत व त्यांच्या पथकाला घटनास्थळी रवाना केले.

नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. मृताच्या अंगावरील कपड्यांच्या खिशात बँकेची काही कागदपत्रे आढळून आल्याने पोलिसांनी त्यावरून मृताची ओळख पटवली. त्यानंतर नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती देण्यात आली. पैठण येथे दाखल झालेल्या नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख निश्चित केली.

Waluj Company Supervisor Body Found
Paithan Accident: विहामांडवा-चोंडाळा रोडवर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

दरम्यान, हा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पैठण पोलीस करीत असून या प्रकरणाचा पुढील तपास जमादार अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news