Paithan Crime | पैठण हादरले : लोखंडी गज, दगडाने ठेचून युवकाचा निर्घृण खून

जायकवाडी उत्तर परिसरात रस्त्यालगतच्या वेड्या बाभळीच्या झाडीत मृतदेह आढळला
Youth Brutally Killed Paithan
Youth Brutally Killed PaithanPudhari
Published on
Updated on

Youth Brutally Killed Paithan

पैठण : पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जायकवाडी उत्तर परिसरात एका युवकाचा लोखंडी गज आणि दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २२) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जायकवाडी उत्तर येथील कमिटी हॉलसमोरील रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने युवकावर प्राणघातक हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे, पोलीस उपनिरीक्षक कविता जगताप, हवालदार कृष्णा उगले, करतारसिंग सिंगल यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

Youth Brutally Killed Paithan
Paithan Accident: विहामांडवा-चोंडाळा रोडवर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

घटनास्थळाची पाहणी करताना रस्त्यावर रक्ताने माखलेले दगड आणि लोखंडी गज आढळून आले. काही अंतरावर रस्त्यालगतच्या वेड्या बाभळीच्या झाडीत संबंधित युवकाचा मृतदेह पडलेला असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी परिसरात चौकशी केल्यानंतर मृताची ओळख अमोल उर्फ प्रभू भास्कर सुरडकर (वय २७, रा. संजयनगर, कातपूर, ता. पैठण) अशी पटली. तो सेंट्रिंगचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून पुरावे संकलित करण्याचे काम हाती घेण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी चौकशीसाठी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

Youth Brutally Killed Paithan
Paithan : पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा चेहरामोहरा बदलणार

या प्रकरणातील पंचनामा करण्यासाठी शासकीय पंचांची आवश्यकता असताना जवळच पाटबंधारे विभागाचे कार्यालय असूनही तेथील कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे शासकीय पंच उपलब्ध न झाल्याने मृतदेह अनेक तास घटनास्थळीच पडून होता.

अखेर स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतीमार्फत शासकीय पंच उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर पंचनामा पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

अमोल सुरडकर यांचा खून नेमका कोणत्या कारणातून झाला आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्यासाठी एमआयडीसी पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news