Municipal Election : मनपा निवडणुकीसाठी आज मतदार याद्या होणार प्रसिद्ध

दोन वेळा बदलल्या तारखा, याद्या १० झोन कार्यालयांत लावणार
Voter lists for municipal elections to be published today
मनपा निवडणुकीसाठी आज मतदार याद्या होणार प्रसिद्धFile Photo
Published on
Updated on

Voter lists for municipal elections to be published today

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळा- पत्रकानुसार महापालिकेने प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या तयार केल्या आहेत. या याद्या प्रसिद्ध करण्यासाठी आयोगाने दोन वेळा कार्यक्रमात बदल करून तारखा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. अखेर आज (दि.२०) या प्रारूप याद्या महापालिकेच्या १० झोन कार्यालयांमध्ये सकाळी ११ वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

Voter lists for municipal elections to be published today
Bhondu Baba : उपचाराच्या बहाण्याने विनयभंग करणाऱ्या भोंदू बाबाला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

महापालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग रचना तयार केली. त्यानंतर निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढली. या सोडतीसोबतच महापालिका निवडणूक विभागाने प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे कामही सुरू केले होते. ही प्रारूप मतदार यादी आयोगाच्या वेळापत्रकानुसार ६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती, परंतु ऐनवेळी मतदार याद्या प्रसिद्धीच्या तारखांमध्ये बदल करून आयोगाने सुधारित वेळापत्रक काढले. त्यानुसार १४ नोव्हेंबर रोजी मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार होत्या. मात्र ही तारीखही पुढे ढकलत २० नोव्हेंबर रोजी यादी प्रसिद्ध करण्याबाबत सुधारित वेळापत्रक काढले. आयोगाच्या तारीख पे तारीखकडे इच्छुकांचे लक्ष लागले होते. आयोगाने हेच वेळापत्रक कायम ठेवले आहे.

प्रभागनिहाय तयार केलेल्या प्रारूप मतदार याद्या आज सकाळी ११ वाजता सर्व १० झोन कार्यालयांमध्ये प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

Voter lists for municipal elections to be published today
Sambhajinagar Crime : प्रेयसीच्या पतीला जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण; अपहरण करून रस्त्यावर फेकले

सूचना-हरकतींसाठी ७ दिवस

विधानसभा निवडणुकीसाठी वापरलेल्या मतदार याद्या महापालिकेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्यामुळे या याद्यांची विभागणी प्रभागनिहाय करून त्या प्रसिद्ध करण्यात याव्यात, असे आदेश आयोगाने महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू असून, आज याद्या प्रसिद्ध होताच त्यावर सूचना हरकतींसाठी २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली जाणार आहे. तर प्राप्त हरकतींवर निर्णय घेऊन ५ डिसेंबरपर्यंत अंतिम याद्या प्रसिद्ध करायच्या आहेत. त्यानंतर ८ डिसेंबरपर्यंत मतदार केंद्र निश्चित करून त्या-त्या मतदार केंद्रनिहाय मतदार याद्या १२ डिसेंबरपर्यंत प्रसिद्ध करायचे आदेश आयोगाने दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news