Voter Awareness : मतदानाचा वाढवू टक्का, लोकशाहीत येईल गोडवा

मनपाकडून मतदानाची जनजागृती : शहरात ५० पेक्षा अनेक ठिकाणी फलक
Voter Awareness
Voter Awareness : मतदानाचा वाढवू टक्का, लोकशाहीत येईल गोडवाFile Photo
Published on
Updated on

Voter awareness campaign by the municipal corporation

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा

महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाने मतदार जनजागृती मोहीम हाती घेतली असून, शहरात गर्दीच्या ५० हून अधिक ठिकाणांवर स्टैंडीज व फलक लावण्यात आले आहेत.

Voter Awareness
Muncipal Election : मनपाच्या 29 प्रभागांत तिरंगी-चौरंगी लढती

विमानतळ, बस, रेल्वेस्थानक, मॉल्ससह सिनेमागृहांमध्ये मतदानासंदर्भातील महत्त्व पटवून देणारे संदेश झळकत आहेत. यावरून प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत जनजागृतीला अधिक व्यापक स्वरूप दिले असल्याचे दिसून येत आहे.

महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून मतदार जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत आणि उपायुक्त तथा मतदार जनजागृती कक्ष प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरभर जनजागृती अभियान राबवले जात आहे.

Voter Awareness
Municipal election : प्रभाग २३, २४, २५ मध्ये ५५ जणांनी घेतली माघार

या मोहिमेअंतर्गत शहरातील गर्दीच्या आणि महत्त्वाच्या ठिकाणी ५० हून अधिक स्टैंडीज व बॅनर्स लावण्यात आले आहेत. विमानतळ, बसस्थानक, रेल्वेस्थानक, मॉल्स तसेच विविध सिनेमागृहांमध्ये मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देणारे संदेश झळकत आहेत.

यात प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत जनजागृतीला व्यापक स्वरूप दिले आहे. यात शहरभर ३०० घंटागाड्यांद्वारे ऑडिओ अपील प्रसारित करण्यात येत असून, ४५० कॅमेरा पोलवरील ध्वनीक्षेपकांद्वारे मतदानाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला जात आहे.

मतदानासंदर्भातील संदेश प्रदर्शित

स्मार्ट सिटी अंतर्गत उभारलेल्या ५० डिजिटल आऊटडोअर डिस्प्लेवरही मतदानासंदर्भातील संदेश प्रदर्शित केले जात आहेत. विशेष म्हणजे, प्रभागनिहाय मतदान प्रक्रियेबाबतही सविस्तर जनजागृती करण्यात येत आहे. शहरातील २८ प्रभागांमध्ये चार, तर २९ क्रमांकच्या प्रभागात तीन उमेदवार निवडण्याबाबत मतदारांना स्पष्ट माहिती दिली जात असून, यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का मोठ्याप्रमाणात वाढण्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news