Muncipal Election : मनपाच्या 29 प्रभागांत तिरंगी-चौरंगी लढती

शेवटच्या दिवशी ५५४ जणांची माघार
Chhatrapati Sambhajinagar Municipal
Chhatrapati Sambhajinagar MunicipalFile Photo
Published on
Updated on

Sambhajinagar Muncipal Election News

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. २) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ५५४ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे २९ प्रभागांतील ११५ वॉर्डात ८५९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, यात ७० वॉडांमध्ये भाजप, शिवसेना, उबाठा यांच्यात तिरंगी, तर ४५ वॉडांपैकी कुठे कांग्रेस-एमआयएम, राष्ट्रवादी कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडी यांच्यात चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र उमेदवारांच्या संख्येवरून दिसत आहे.

Chhatrapati Sambhajinagar Municipal
Crime News : जुन्या पैशाच्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळपासूनच उमेदवारांची धावपळ सुरू होती. काही कार्यालयात गोंधळ उडाला, तर काही कार्यालयात शांततेत प्रक्रिया पार पडली. यात पहिल्या दिवशी ३३, तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ५५१ अशा ५५४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय-१ च्या अंतर्गत असलेल्या ३, ४, ५ या तीन प्रभागांतून ३१ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणूक रिंगणात १०७ उमेदवार राहिले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय-२ च्या अंतर्गत असलेल्या १५, १६, १७ या प्रभागांतून ७४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ८८ उमेदवार निवडणूक रि-गणात राहिले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय-३ अंतर्गत असलेल्या ६, १२, १३, १४ या चार प्रभागांतून एमआयएमच्या एका अधिकृत उमेदवारासह ४१ जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात ९१ उमेदवार आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Municipal
पुढारी टॅलेंट सर्च उपक्रमामुळे शैक्षणिक गुणवत्तावाढीस चालना

निवडणूक कार्यालय-४ अंतर्गत असलेल्या प्रभाग १, २, ७ मधून ५० जणांनी अर्ज मागे घेतल्याने आता ९३ उमेदवार रिं गणात आहेत. निवडणूक कार्यालय-५ अंतर्गत ८, ९, १०, ११ या चार प्रभागांतून ७३ उमेदवारांनी माघार घेतल्याने येथे १०७उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

तर निवडणूक कार्यालय-६ अंतर्गत

२३, २४, २५ प्रभागातून ५८ उमेदवारांनी माघार घेतल्याने ९८ जण निवडणूक राहिले आहेत. निवडणूक कार्यालय-७ अंतर्गत २१, २२, २७ या तीन प्रभागांमधून ९१ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली असून, ८५ उमेदवार रिंगणात आहेत.

निवडणूक कार्यालय-८ अंतर्गत येणाऱ्या २६, २८, २९ मधून ७२ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता १२४ उमेदवार निवडणूक लढवणार आहे. निवडणूक कार्यालय-९ अंतर्गत १८, १९, २० या तीन प्रभागांतील ६४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ७१ उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रभागनिहाय उमेदवारांची संख्या लढात घेता. तब्बल ६५ ते ७० वॉडर्डामध्ये शिवसेना-भाजप आणि उबाठा यांच्यातच लढत होण्याची शक्यता आहे.

चौरंगी लढती होणार

नगरपरिषदांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेसने चांगलीच बाजी मारली. परंतु असे असले तरी महापालिकेच्या हद्दीत एमआयएमचे प्राबल्य अधिक आहे. त्यामुळे शहरातील मुस्लिमबहुल भागत एमआयएमसोबतच कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि वंचितमध्ये थेट लढत रा-हणार असून, चौरंगी लढतीचे चित्र दिसत आहे, तर दलितबहुल भागात तिरंगी लढतीची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news