Crime News : हॉटेलसमोर दोन गटांत तुफान हाणामारी करत राडा

१३ आरोपींसह ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल
Crime News
Crime News : हॉटेलसमोर दोन गटांत तुफान हाणामारी करत राडाfile photo
Published on: 
Updated on: 

Violent clash breaks out between two groups in front of a hotel

पाचोड, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील पाचोड येथे हॉटेल निसर्गसमोर दोन गटांत जोरदार वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. एकमेकांना शिवीगाळ करीत लाथा बुक्क्याने मारहाण केल्याप्रकरणी पाचोड पोलिसांनी १३ जणांसह अन्य ७ ते ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवार (दि. २०) रात्री ८.५० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

Crime News
Sambhajinagar News : गुंठेवारीअंतर्गत ३ महिन्यांत १६ हजार मालमत्ता अधिकृत

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचोड येथील हॉटेल निसर्गसमोर दोन गटांतील संबंधित व्यक्तींमध्ये वादावादी सुरू झाली. एकमेकांसोबत मोठमोठ्याने आरडाओरड करून शिवीगाळ केली. त्यानंतर दोन्ही गटांतील व्यक्तींनी एकमेकांना हाताने तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करून परिसरात गोंधळ घातला.

याप्रकरणी पोलिस अंमलदार नागनाथ पंढरीनाथ केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळू भालसिंगे, किशोर भालसिंगे, अनिकेत भालसिंगे, अमोल भालसिंगे, शुभम ऊर्फ गजू भालसिंगे, मुरली भालसिंगे, गणेश ऊर्फ गोविंद कडुबाळ गवारे, भागवत बापूराव भुमरे, ओम संतोष भुमरे, अभिषेक ऊर्फ चिलट्या बंडू जाधव, अजय डूकळे, नितीन डूकळे, अजय वसंत भुमरे यांच्यासह अन्य ७ ते ८ जणांविरुद्ध पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उपनिरीक्षक महादेव नाईकवाडे करीत आहेत.

Crime News
Sillod News : दुष्काळात गरजूंना मदतीचा आधार; १ हजार विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप

पाचोड येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

गेल्या अनेक दिवसांपासून पाचोड येथे विविध घटनांचे पेव फुटले आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून तरुण पिढीमध्ये गुन्हेगारी व अवैध धंद्यांचे प्रमाण वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.