

16,000 properties regularized under the 'Gunthewari' scheme within 3 months
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने राबविलेल्या विशेष मोहीमेत आऑक्टोबरपर्यंत प्रशासनाकडे गुंठेवारी अंतर्गत मालमत्ता नियमित करुन घेण्यासाठी १६ हजार नागरिकांनी प्रस्ताव दाखल केले होते. त्यासर्व संचिकांना आयुक्त अमोल येडगे यांनी मंजूरी दिली आहे. त्यामुळे या सर्व मालमत्ता अधिकृत झाल्या असून त्यापैकी ९ हजार मालमत्ताधारकांना गुंठेवारी प्रमाणपत्रे वाटपही झाली आहे. उर्वरीत ७ हजार ५०० मालमत्ताधारकांना ३१ डिसेंबरपूर्वी प्रमाणपत्रे वितरीत करा, असे आदेश आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत.
शहरातील बहुतांश वसाहती गुंठेवारीत मोडतात. त्यामुळे या अनधिकृत मालमत्ता गुंठेवारी कायद्याअंतर्गत नियमित करुन घेण्यासाठी प्रशासनाने मालमत्ताधारकांना निर्वानीचा इशारा दिला होता. त्यानुसार महापालिकेने गुंठेवारीसाठी अर्ज स्विकृती देखील बंद केली आहे. प्राशसनाच्या इशाऱ्यानंतर नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत मालमत्ता नियमितीकरणासाठी संचिका दाखल केल्या होत्या.
यात १६ हजार मालमत्तांचे प्रस्ताव प्रशासनाला प्राप्त झाले होते. मात्र, गुंठेवारी विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कामाचा निपटारा करण्यासाठी अन्य विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही मदत घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नोव्हेंबर महिन्यातही गुंठेवारीची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे.
डिसेंबर महिन्यात १३ हजान प्रमाणपत्रांचे वितरण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिले होते. आत डिसेंबरअखेर शंभर टक्के गुंठेवारी प्रमाणपत्रांचे वितरण करण्याचा संकल्प प्रशासनाने केल असून, त्यासाठी कामात कोणतीही दिरंगाड खपवून घेतली जाणार नाही, अशा सक्त सूचन आयुक्तांनी दिल्या आहेत.
५० टक्के सवलतीला प्रतिसाद
गुंठेवारी नियमितीकरणासाठी महापालिकेने विशेष सवलती जाहीर केल्या होत्या. त्यात बेटरमेंट शुल्कात ५० टक्के सवलत, तसेच अतिरिक्त शुल्क आणि बाजूच्या मोकळ्या जागेच्या नियमभंगापोटी आकारण्यात येणारा २० टक्के दंड पूर्णपणे माफ करण्यात आला होता. याचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी अर्ज दाखल केले. ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले होते.
शेवटची संधी...
आता प्रलंबित अर्जाचा निपटारा करून प्रमाणपत्रांचे वितरण पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुंठेवारी नियमितीकरणाची मोहीम पुन्हा सुरू होण्याची शक्यता कमी असल्याने नागरिकांसाठी ही शेवटची संधी ठरण्याची शक्यता आहे