Sillod News : दुष्काळात गरजूंना मदतीचा आधार; १ हजार विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत सिल्लोडमध्ये विविध मदत उपक्रम राबविण्यात आले.
Sillod News
Sillod News : दुष्काळात गरजूंना मदतीचा आधार; १ हजार विद्यार्थिनींना सायकलींचे वाटपfile photo
Published on: 
Updated on: 

A helping hand for those in need during a drought; bicycles distributed to 1,000 girl students

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत सिल्लोडमध्ये विविध मदत उपक्रम राबविण्यात आले. आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जवळपास एक हजार गरजू विद्यार्थिनींना सायकली, तालुक्यातील ५६७ निराधार लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे, तर गरजू कुटुंबांना किराणा साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत या उपक्रमांचा शुभारंभ झाला.

Sillod News
Accident News : मंगरूळ फाट्याजवळ अवैध वाळू वाहतुकीने घेतला दोघांचा बळी !

यावेळी सचिन अहिर यांनी दुष्काळाच्या काळात सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन व शिवसेना प्रयत्नशील असल्याचे सांगितले आमदार सत्तार यांनी गरजू विद्यार्थिनींचा शिक्षणाचा प्रवास सुलभ व्हावा आणि निराधारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने उपक्रम राबविल्याचे स्पष्ट केले. संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी धैर्याने परिस्थितीचा सामना करावा, शासन त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाहीही अहिर यांनी दिली.

Sillod News
Vegetables : वांगी, गिलके, दोडक्याचे दर कडाडले; टोमॅटो, फ्लॉवरच्या भावात घसरण

या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शिक्षणासाठी वाहतुकीचा आधार, निराधारांना आर्थिक सहाय्य आणि गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा दिलासा मिळणार आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. मनोज राठोड, नगराध्यक्ष अब्दुल समीर सत्तार, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन गाढे, बाजार समितीचे सभापती सतीश ताठे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व पालक उपस्थित होते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.