केवायसीसाठी कळंकीचे ग्रामस्थ डोंगरावर

गावात मोबाईल नेटवर्कचा बोजवारा, डिजिटल इंडियाला चपराक
Sambhajinagar News
केवायसीसाठी कळंकीचे ग्रामस्थ डोंगरावरFile Photo
Published on
Updated on

Villagers of Kalanki on top of the mountain for KYC

संजय मुचक

कन्नड : केंद्र व राज्य सरकारकडून नागरिकांच्या सोयीसाठी विविध योजना सुरू केल्या जातात, परंतु त्या प्रत्यक्षात गावापर्यंत पोहोचत नाहीत, हे वास्तव तालुक्यातील कळंकी गावात प्रकर्षाने जाणवत आहे. रोजगार हमी योजनेतील जॉबकार्ड केवायसीची अंतिम तारीख जवळ असून, नागरिकांना केवायसी पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. गावात मोबाईल नेटवर्कच नाही, तर बीएसएनएलची स्थितीचेी ङ्गङ्घतीन तेराफ्फ झाले आहे. नेटवर्क शोधण्यासाठी नागरिकांना दोन ते तीन किलोमीटर जंगल परिसरात फिरावे लागते. कधी एखाद्या ठिकाणी ओटीपी आला तर एखाद्याचे दैव पावले, अशी परिस्थिती आहे.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : सात महिन्यांत १८४ कोटींचा कर वसूल

लाडकी बहीण योजना असो वा आधार ओटीपी सत्यापन, सर्वत्र एकच अडथळा तो नेटवर्कचा अभाव. परिणामी गावकऱ्यांना केवायसी प्रक्रियेसाठी तालुक्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागते. कळंकी गावातील नागरिक सांगतात की, रोजगार हमी योजना, जलजीवन मिशन, आरोग्य सेवा आणि रस्ते या सर्व सुविधा नावालाच आहेत. डिजिटल इंडिया म्हटले की मोबाईलवर काम व्हावे, अशी अपेक्षा असते, पण आम्ही अजून जंगलात नेटवर्क शोधतोय. फ्फ सत्तर वर्षांनंतरही मूलभूत सुविधा न मिळालेल्या या भागातील नागरिक प्रश्न विचारत आहेत, हा विकास की केवायसीची जत्रा ?

तालुक्यातील कळंकी हे गाव आजूबाजूला डोंगराच्या मध्यभागी खाली असून, गेल्या अनेक वर्षांपासून येथे मोबाईल रेंज नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. ही गैरसोय दूर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. येथे मोबाईल रेंज नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. ही गैरसोय दूर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Sambhajinagar News
Bogus Call Center : भाविक पटेलच्या घरझडतीत लॅपटॉप, मोबाईल, क्रेडिट कार्ड्स, कागदपत्रे जप्त

ग्रामस्थांत संताप

शासकीय योजनांचा लाभघेण्यासाठी शासनाने योजना ऑनलाईन केल्या आहेत. अर्ज करण्यापासून ते सर्व कागदपत्रे अपलोड ऑनलाईन करावे लागत आहेत. कन्नड तालुक्यातील कळंकी गाव चारही बाजूंनी डोंगररांगेत वसले आहे. यामुळे येथे मोबाईलला रेंज येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना ऑनलाईन अर्जासह केवायसी करण्यासाठी एखाद्या उंच डोंगराव चढावे लागते. त्यानंतर रेंज मिळाली तर नशीब. दरवर्षी ही अडचण असल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे. याबाबत शासकीय यंत्रणेसह मोबाईल कंपनीलाही ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

एका मोबाईल कंपनीच्या टॉवरच्या बॅटऱ्या जळाल्या आहेत. याबाबत त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क करून ग्रामस्थांची व्यथा मांडली. मात्र अनेक संपर्क करूनही सदर कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. यामुळे ग्रामस्थांत संताप आहे. कुठल्याच कंपनीच्या मोबाईलला रेंज येत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. सदरील कंपनीच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन बॅटरी साहित्य मिळून गावात रेंज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आहे.
हरिष थोरात, उपसरपंच, कळंकी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news