Sambhajinagar News : सात महिन्यांत १८४ कोटींचा कर वसूल

मालमत्ता कर-पाणीपट्टी वसुली : मनपा यंदा २०० कोटींचा आकडा ओलांडणार
Chhatrapati Sambhajinagar
Sambhajinagar News : सात महिन्यांत १८४ कोटींचा कर वसूल File Photo
Published on
Updated on

Sambhajinagar Muncipal Corporetion Tax collection of Rs 184 crore in seven months

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी मालमत्ता कर थकबाकीसह ७०० कोटी, तर पाणीपट्टी थकबाकीसह २५० कोटी असे एकूण ९५० कोटी रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्या तुलनेत पहिल्यांदाच एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत महापालिकेने १८४ कोटी ३२ लाख रुपयांचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची वसुली केली आहे. जून महिन्यापासून व्याजाच्या रकमेवर माफी देण्याचा निर्णय घेतल्याने वसुलीचा आकडा दीडशेपार पोहोचू शकला. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच महापालिका कर वसुलीत २०० कोटींचा आकडा ओलांडणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Mahavitaran : स्वयंचलित परवानगी योजनेचा ग्राहकांना लाभ

महापालिकेच्या मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची थकबाकी दीड हजार कोटीपेक्षा अधिक आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त तथा कर संकलन व निर्धारक अधिकारी विकास नवाळे यांनी कराच्या वसुलीसाठी झोन कार्यालयनिहाय थकबाकीदारांच्या याद्या तयार केल्या. थकबाकीदारांना नोटीस पाठवल्या. थकबाकी वसूल करण्यासाठी १ जून ते ३१ जुलैदरम्यान कर से मुक्ती ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. मालमत्ता करातील शास्तीच्या व्याजामध्ये ९५ टक्के सूट लागू केली.

या योजनेला मालमत्ताधारकांचा वाढता प्रतिसाद पाहून प्रशासक जी. श्रीकांत यांनी करावरील व्याजाच्या या सवलतीला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. या मुदतीत थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची वसुली शंभर कोटी झाली. त्यानंतर १५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान मालमत्ता कराच्या शास्तीमधील व्याजामध्ये ७५ टक्के सूट देण्यात आली.

Chhatrapati Sambhajinagar
Sambhajinagar Crime : भररस्त्यात टोळक्याकडून तरुणाची निघृण हत्या

या सवलतीचा फायदा मालमत्ताधारकांनी घेत ७० कोटींची वसुली झाली. दिवाळीच्या तोंडावर कर वसुलीसाठी शास्तीच्या व्याजावर ५० टक्के सूट देण्यात आली. या सुटीचा फायदा घेत मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची थकबाकीची रक्कम जमा केली.

५ महिन्यांत शंभर कोटींचे उद्दिष्ट

मनपाने पाचशे कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असले तरी ७ महिन्यांत सुटीची योजना राबवून १८४ कोटी रुपये वसूल झाले. उर्वरित पाच महिन्यांत १०० कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. या पाच महिन्यांत एक लाखाहून अधिक कर थकविणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news