

Vidyadeep balgruha girls Demand release three detained sisters
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विद्यादीप बालगृहातील मुलींचा छळ केल्याच्या प्रकरणात हर्मूल कारागृहात असलेल्या तीन सिस्टरला सोडण्याची मागणी करत बालगृहातील ७५ मुलींनी शुक्रवारी (दि.११) सायंकाळी सहा वाजेदरम्यान चांगलाच गोंधळ घातला. दोन महिलांची नावे घेऊन विरोधात घो-षणाबाजी केली.
अखेर पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांसह छावणी पोलिस, दामिनी पथकाने धाव घेत मुलींची समजूत घातली. रात्री नऊ वाजेपर्यंत गोंधळ सुरू होता. दरम्यान, मान्यता रद्द झाल्याने विद्यादीपमधील सर्व मुलींचे शनिवारी (दि.१२) दुसरीकडे स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, छावणी ठाण्यात नर्स सुचिता भास्कर गायकवाड (५६), केअर टेकर अलका फकीर साळुंके (४६), सहायक अधीक्षिका वेलरी भगवा जोसेफ (३१), कमल डेव्हिड गि (४८) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल यातील तिघांना अटक झाली असून, तर सध्या त्या हर्सल कारागृहात आहेत. त् तीन सिस्टरला सोडण्याच्या मागणीसार बालगृहातील ७५ मुलींनी शुक्रवारी गोंध घातला.
आरडाओरड केल्या परिसरातील नागरिक भयभीत झाले लोखंडी गेटवर मुलींनी उड्या मारल्या मोठे आवाज झाले. नेमके आत का झाले हे कोणालाही समजेना. अखे छावणी पोलिसांना कळविण्यात आले दुपारी चार वाजेपासून सुरू असलेल् गोंधळ सायंकाळी अधिकच वाढल दामिनी पथकाच्या कांचन मिरघे, बा कल्याण समिती अध्यक्षांसह का सदस्यही दाखल झाले. मात्र मुली कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या.
पोलिस अधिकारी, बाल कल्याण समिती मुलींची समजूत घालत असताना काही मुलींनी आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही कोणालाही जाऊ देणार नाही, असे म्हणत आतील गेटला कुलूप लावून घेतले होते, असे सूत्रांनी सांगितले.