Sanjay Shirsat | संजय शिरसाटांचा पैशांची बॅग भरलेला व्हिडिओ व्हायरल, राऊतांच्या दाव्यानंतर खळबळ, नेमकं खरं काय?

व्हिडिओत संजय सिरसाट बेडरुममध्ये सिगारेट ओढत बसले असून त्यांच्याजवळ एक पैशांनी भरलेली बॅग दिसते
Sanjay Shirsat
संजय शिरसाटांचा पैशांची बॅग भरलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Pudhari Photo)
Published on
Updated on

Sanjay Shirsat Video

शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा पैशांनी भरलेल्या बॅग सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत संजय सिरसाट त्यांच्या बेडरुममध्ये सिगारेट ओढत बसले असून त्यांच्याजवळ एक पैशांनी भरलेली बॅग दिसते. हा व्हिडिओवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.

''संबंधित मंत्र्याला आयकर विभागाची नोटीस आली आहे. त्यांचा एक व्हिडिओ मला कोणतीरी पाठवला. त्यामध्ये सिरसाट पैशांनी भरलेली बॅग घेऊन बसलेले दिसतात. हे पुरावे सर्वत्र जात असतात. सरकारमध्ये आहात म्हणून तुम्हाला कोणी हात लावत नाही, हा एक भ्रम असते. हा भ्रम काही काळ टिकते. पण त्याच्यावर कारवाई होत असते.'' असे राऊत यांनी म्हटले आहे.

संजय शिरसाट व्हिडिओवर काय म्हणाले?

या व्हिडिओवर संजय शिरसाट यांनी खुलासा केला आहे. या व्हिडिओत जे दिसते ते माझे बेडरुम आहे. माझ्यासोबत माझा लाडका कुत्रा आहे. तिथे बॅग ठेवली आहे. मी प्रवासातून आलोय. त्यात कपडे ठेवली आहेत. तुम्हाला कपड्याच्या बॅगमध्ये नोटा दिसतात का? असा संतप्त सवाल सिरसाट यांनी केला. मी प्रवासातून आणलेली ही बॅग आहे. यात गैर काही नाही. त्यात पैसे असते तर मी तिथे ठेवले असता का? ते कपाटात ठेवले असते, असेही त्यांनी म्हटले आहे.

यावरुन त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ''संजय राऊत भूंकण्याचे काम करतात. हा वेडा माणूस आहे. त्याला हातपाय बांधून हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे की काय असे वाटू लागले आहे.'' अशा शब्दांत त्यांनी राऊतांचा समाचार घेतला आहे.

'पैशाच्या बॅग अशा पडतात का?'

मुळात मुर्खासारखे वक्तव्ये करणे संजय राऊत यांना जमते. सकाळ, संध्याकाळ, दुपार ते एकनाथ शिंदे हे त्यांचे टार्गेट असतात. त्यांची गेलेली सत्ता आजही त्यांना झोपू देत नाही. व्हिडिओ काय दाखवतो? ते माझे घर आहे. मी बेडरूममध्ये बेडवर बसलो आहे, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.

आमच्याकडे मातोश्री नाही. चिट्ठी देऊन आत बोलावले जात नाही. कोणीही माझ्याकडे कामासाठी येते. व्हिडिओ काढला असेल त्यात गैर काही नाही. महिलांचा छळ करणारे दुसऱ्यांच्या बॅग काय पाहता? ती प्रवासानंतर आणलेली बॅग आहे. पैशाच्या बॅग ह्या अशा पडतात का? पैसे असते तर मी कपाटात ठेवले असते. या व्हिडिओमध्ये काहीही तथ्य नाही. तोच व्हिडिओ दोन वेळा पाहा. मग तुम्हाला समजेल की तुम्हाला तो किती मूर्ख आहे, असे सवाल शिरसाट यांनी उपस्थित केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news