

Vehicle queues return to petrol pumps
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर शहरात दोन दिवसांपासून सर्वच पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या रांगा लागत आहेत. पेट्रोल संपण्याच्या अफवांमुळे बहुसंख्य वाहनधारकांनी आपल्या वाहनांच्या टाक्या फुल्ल करून घेतल्या. त्यामुळे बुधवारी (दि. २५) दुपारनंतर काही पेट्रोल पंपांवरील पेट्रोल पंपावरील साठा संपल्याने तिथे नो स्टॉकचे बोर्ड लावण्यात आले.
आखाती देशातील युद्धाचा परिमाण इंधनाच्या पुरवठ्यावर होत आहे. युद्धाच्या सुरुवातीला इंधन टंचाईमुळे सर्वत्र भल्यामोठ्या रांगा लागल्या होत्या. प्रशासनाने लक्ष देऊन पुरवठा सुरळीत केला. त्यानंतर परिस्थिती सुधारली. मात्र, मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात दररोज येणाऱ्या पेटेल, डिझेलच्या पुरवठ्यात कमतरता दिसून आली. परिमाणी काही पेट्रोल पंपावरील पेट्रोल, डिझेल संपले.
नो स्टॉकचे बोर्ड काही पंपावर दिसून आल्यानंतर नागरिकांत इंधन टंचाईची भीती निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांनी इंधन भरून घेण्यासाठी पेटेल पंपांवर गर्दी करण्यास सुरुवात केली. शहरातील बहुतांशपंपांवर रांगा लागल्याचे दिसून आले. बुधवारी दुपारनंतर शहरातील सहा ते सात पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड लागले.