

Vegetable Prices: Prices Soar During Shravan! Garlic Hits ₹400 Mark
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : किरकोळ भाजीपाला बाजारात आवक आणि मागणीच्या प्रमाणानुसार विविध भाज्यांच्या दरात चढ-उतार सुरू आहे. आजच्या बाजारात कंटुल्यांना सर्वाधिक २८० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. त्यापाठोपाठ लसणाचे दर ३०० ते ४०० रुपये, तर अद्रकाचे दर २४० रुपये प्रतिकिलो आहेत. त्यामुळे स्वयंपाकघरातील फोडणीसाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च तुलनेने वाढला आहे.
भाजीपाला बाजारात आवक आणि मागणीनुसार विविध भाज्यांच्या दरात चढ-उतार सुरू असून, आज कंटुल्यांना सर्वाधिक २८० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. मात्र रोजच्या आहारातील प्रमुख भाज्यांचे दर तुलनेने स्थिर आहेत. यात बटाटे २५ ते ३० रुपये, कांदा ३० ते ४० रुपये, तर टोमॅटो ४० रुपये प्रतिकिलो आहेत.
भोपळा व काकडी प्रत्येकी ४० रुपये, वांगी ५० रुपये, तर कोबी आणि सिमला मिरची प्रत्येकी ६० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहेत. हिख्या भाज्यांमध्ये भेंडी आणि गाजराचे दर प्रत्येकी ६० रुपये आहेत. कारले, वाल, गिलके, हिरवी मिरची, दिलपसंद, दोडके, शेवगा आणि श्रावण घेवडवाचे दर प्रत्येकी ८० रुपये प्रतिकिलो आहेत.
लिंबाला ६० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. दरम्यान, श्रवण महिन्यामुळे उपवास तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे काही विशिष्ट भाज्यांना मागणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने त्याचा परिणाम दरावर होत आहे. विशेषतः श्रावण घेवडा आणि कंटुले यांना मागणी असल्याने त्यांच्या दात तुलनेने वाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.