

Vande Bharat Express will run from Nanded from tomorrow
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जालना येथून मुंबई मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार करण्यात आला असून, २६ ऑगस्टपासून ही गाडी नांदेड-मुंबई अशी धावणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २६ ऑगस्ट रोजी नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाख-वून गाडी मार्गस्थ करणार आहेत.
ही गाडी नांदेड ते मुंबई दरम्यानचे ६१० किमी अंतर ९ तास २५ मिनिटांत पूर्ण करेल. यात २० डबे (एक्झिक्युटिव्ह- २, चेअर कार-१८) असतील, आसन क्षमता १४४० आहे. ही गाडी नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर तसेच इतर शहरातून मुंबई येथे दुपारी पोहोचणार आणि मुंबईवरून संध्याकाळी परतीचा प्रवास करणार आहे. ही गाडी आठवड्यातून ६ दिवस (बुधवार वगळता नांदेडहून आणि गुरुवार वगळता मुंबईहून) धावणार आहे.
या एक्सप्रेसमध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत. यात ऑन-बोर्ड वाय-फाय इन्फोटेनमेंट, जीपीएस, इंटीरियर, बायो व्हॅक्यूम टॉयलेट, डिफ्यूज्ड एलईडी लाइटिंग, चार्जिंग पॉइंट्स, वाचन दिवे, रोलर ब्लाइंड्स, यूव्ही लॅम्पसह एअर कंडिशनिंग सिस्टम अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. २६ ऑगस्ट उद्धघाटनाच्या पोहचणार आहे. दिवशी ही गाडी नांदेड येथून सकाळी ११.२० वाजता निघणार असून ती छत्रपती संभाजीनगरला दुपारी २.४८ वाजता तर मुंबई सीएसएमटी येथे रात्री ९.५५ वाजता
वंदे भारत एक्सप्रेस नियमित वेळेत नांदेड येथून सकाळी ५ वाजता सुटणार असून, ती छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी ८.१३ वाजता तर मुंबई सीएसएमटी येथे दुपारी २. २५ वाजता पोहचणार. तसेच मुंबई सीएसएमटी येथून ही गाडी दुपारी १.१० मिनिटांनी निघणार ती छत्रपती संभाजीनगर येथे सायंकाळी ६.४८ वाजता तर नांदेड येथे रात्री १०.५० वाजता पोहोचणार आहे.