Sanjay Shirsat: डीजे नको बँड लावा, नेत्यांनी पैसे दिले नाही तर माझी बॅग आहेच; शिरसाटांची फटकेबाजी

संजय शिरसाटांची फटकेबाजी; राजकीय नेत्यांमुळेच दणदणाट झाल्याची कबुली
Sanjay Shirsat
Sanjay ShirsatPudhari
Published on
Updated on

Sambhajinagar Sanjay Shirsat on Money Bag and Dj Ban

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : डीजेपेक्षा चाळीसगाव, वैजापूरचा बँड लावा. पैसे कमी पडले तर आम्ही सगळे नेते आहेतच. काही नाही जमले तर मी तर आहेच. माझी बॅग उघडीच आहे, असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी म्हणताच एकच हशा पिकला. रविवारी (दि. २४) शांतता समितीच्या बैठकीत संजय शिरसाट यांनी तुफान फटकेबाजी करत टीकाकारांना प्रतिउत्तर दिले.

Sanjay Shirsat
Ganesh Mandal News : नवीन गणेश मंडळांना मनपाकडून तीन वर्षांची निःशुल्क परवानगी

त्यांच्या नोटांच्या व्हायरल व्हिडिओबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, व्हिडिओ चालत राहतील. शिरसाट याची चिंता करतो का? उलट लोक आपल्याला करोडपती समजत असेल तर आपल्या बापाचे काय जाते? माझा हा डायलॉगही फेमस झाला आहे, असे शिरसाटांनी म्हटल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

शिरसाट पुढे म्हणाले की, कितीही वाटोळे झाले तरी कार्यकर्ता दुखावला नाही पाहिजे, ही भूमिका नेतेमंडळी घेत असल्यानेच डीजेचा दणदणाट सुरू आहे, अशी कबुलीच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली. काही लोकांना वाईट वाटेल, पण ही वस्तुस्थिती असल्याचे सांगून शिरसाट यांनी एक किस्सा सांगून डीजेमुळे किती धोका आहे याची आपबिती सांगितली.

Sanjay Shirsat
दुर्लक्ष समजू नका, अवैध धंदे, कुठे सुरू सर्व माहिती : शिरसाट

शिरसाट म्हणाले की, माझा एक कार्यकर्ता आला. त्याने तोंडभरून कौतुक केले. कार्यकत्याने पुण्याहून ८ लाखांचा डीजे आणला व तिथे मला बोलावले. माझ्यासाठी १०० किलोंचा फुलांचा हार आणला. मला वाटले माझ्या वजनापेक्षा जास्त वजनाचा तो हार गळ्यात टाकून फाशी देतो की काय? अंबादास दानवे देवा शप्पथ सांगतो, माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. त्या डीजेचा एवढा आवाज की, मी तिथे खालपासून वरपर्यंत थरथरत होतो. डीजेमुळे मी तेथून कधी निघतो, अशी माझी अवस्था झाली होती. त्यामुळे डीजे वापरू नका, असा किस्सा शिरसाटांनी सांगितला.

डीजे लावू नका पालकमंत्र्यांचे आवाहन

शिरसाट पुढे म्हणाले, सर्व गणेश मंडळाचे अध्यक्षांना माझा आव्हान आहे डीजे बंद ठेवा. माझ्याकडे एक व्यक्ती आला तो म्हणाला सुप्रीम कोर्टाचा आदेशावरून पोलिसांनी भोंगे उतरवले. तुम्ही डीजेबद्दल काय करणार सांगा. त्यामुळे भोंगे उतरवल्यानंतर आता काही लोक वाद कसा पेटेल यासाठी प्रयत्न करत आहेत. शहरातील शांतात बिघडविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे डीजे लावू नका, मी गणेश मंडळाच्या अध्यक्षांना आवाहन करतो, असे संजय शिरसाट म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news