Sambhajinagar Crime : वैजापूरमध्ये जलसंधारण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

तक्रारदाराकडून फोन पेद्वारे लाचेची रक्कम स्वीकारली
bribery case watershed department
निखिल अशोक कवाडेpudhari photo
Published on
Updated on

वैजापूर :प्रलंबित बिले मंजूर करण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वैजापूर येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी निखिल अशोक कवाडे (वय ३३) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी सापळा रचून पकडले. जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर अंतर्गत वैजापूर येथे कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून फोन पेद्वारे लाचेची रक्कम स्वीकारली.

तक्रारदार यांची टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी असून त्यांनी वैजापूर जलसंधारण विभागाला भाडेतत्त्वावर बोलेरो गाडी दिली होती. या गाडीचे प्रलंबित बिल तयार करून एमबी बुक, लॉग बुक आणि कंटिजेन्सी बिलावर स्वाक्षरी करून ते मंजुरीसाठी मुख्य कार्यालयाकडे पाठवण्यासाठी कवाडे याने १० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ७ हजार रुपये ऑनलाइन स्वीकारण्याचे त्याने मान्य केले.

bribery case watershed department
Chhatrapati Sambhajinagar fraud : जुनी कार विक्रीचा बहाणा : 6 लाखांची फसवणूक

एसीबीने ७ मार्च रोजी तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी सिद्ध झाली. त्यानंतर शिऊर रोडवरील अयोध्या नगर येथे तक्रारदाराकडून ७ हजार रुपये फोन पेवर स्वीकारल्यानंतर कवाडे याला पंच साक्षीदारांसमक्ष ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

bribery case watershed department
Chatrapati Sambhajinagar : कामचुकार अधिकाऱ्यांना आमदार जाधव यांचा सज्जड दम

ही कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस निरीक्षक वाल्मिक कोरे आणि त्यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news