Chatrapati Sambhajinagar : कामचुकार अधिकाऱ्यांना आमदार जाधव यांचा सज्जड दम

हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; नागरिकांकडून तक्रारी
MLA Sanjana Jadhav strict warning to officers
नागरिकांना विविध प्रमाणपत्राचे वितरण करताना आमदार संजना जाधव,माजी. जि. प सदस्य. किशोर पवार.pudhari photo
Published on
Updated on

चापानेर : कन्नड तालुक्यातील छोट्या-छोट्या कामांसाठी नागरिकांना वारंवार फोन करावे लागतात किंवा वृद्ध नागरिकांना आमदारांना भेटण्यासाठी कन्नडला यावे लागत असेल आणि अनेक बैठका घेऊनही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कार्यवाही होत नसेल, तर असा कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम आमदार संजना जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिला.

कन्नड तालुक्यातील चापानेर येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान-1 अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजना जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी संतोष गोरड, कन्नडच्या तहसीलदार सारिका भगत, माजी. जि. प. सदस्य किशोर पवार, पंचायत समिती सदस्या मंदाताई बोलधने, माजी सरपंच बाबुराव सातदिवे, उपसरपंच कल्याण पवार, डॉ. अशोक पवार, सुखदेव पवार आदी उपस्थित होते.

MLA Sanjana Jadhav strict warning to officers
Railway Accident : दारूच्या नादात धावत्या रेल्वेतून तिघे कोसळले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार सारिका भगत यांनी केले. शासनाच्या विविध योजना व त्यातील त्रुटींबाबत दाखल झालेल्या तक्रारींचे निवारण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी तक्रारींचे निवारण झालेल्या नागरिकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी चापानेर मंडळाधिकारी अशोक निखाळे तसेच महसूल मंडळातील सर्व तलाठी उपस्थित होते.

MLA Sanjana Jadhav strict warning to officers
Hingoli Crime : डोंगरकडा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

नागरिक अडचणीत तातडीने सोडवा

शासनाच्या विविध योजना आता ऑनलाईन झाल्या असल्या तरी काही अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजना यामध्ये वृद्ध नागरिकांचे होणारे हाल हा अत्यंत जिव्हारी लागणारा विषय असल्याची खंत आमदार जाधव यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी परिसरातील अनेक नागरिकांनी फेरफार, जमीन मोजणी, घरकुलाचे हप्ते, पाणंद रस्ते आदी समस्यांबाबत अर्ज सादर केले. संबंधित अर्ज स्वीकारून तक्रारींचे निवारण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news