Vaijapur News : दिनेश परदेशींनी गड कायम राखला

वैजापूर : महायुतीचे १४, तर शिवसेनेचे १० नगरसेवक विजयी
Vaijapur News
Vaijapur News : दिनेश परदेशींनी गड कायम राखलाFile Photo
Published on
Updated on

Vaijapur: 14 corporators from the Mahayuti alliance and 10 from Shiv Sena have won.

नितीन थोरात

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा: गेली पंचवीस वर्षे शहरावर आपले एक हाती वर्चस्व ठेवणाऱ्या डॉ. दिनेश परदेशी यांनि पुन्हा एकदा बाजी मारत आपला गड कायम राखला आहे. हा कौल केवळ व्यक्ती, पक्ष आणि सत्ता समीकरणाचे स्पष्ट संकेत वैजापूर नगराध्यक्ष निवडणुकीचा निकाल हा केवळ एका पदाचा विजय नसून, शहरातील राजकीय प्रवाहाची दिशा स्पष्ट करणारा कौल ठरला आहे. भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांनी तब्बल ६ हजार २४८ मतांच्या फरकाने विजय मिळवत शहरावर आपले वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

Vaijapur News
Gangapur Municipal Council : गंगापूर नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता

विशेष बाब म्हणजे, गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतरही डॉ. परदेशी यांची शहरातील पकड ढळली नाही, उलट ती अधिक बळकट झाल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. त्या निवडणुकीत शहरातून केवळ १ हजार २०० मतांची लीड त्यांना केवळ मिळाली होती. मात्र आता नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत लीड कितीतरी पट दुप्पट झाली आहे. त्यामुळे हा विजय व्यक्तीकेंद्रित नेतृत्वावर मिळालेला जनादेश मानला जात आहे.

दुसरीकडे, शिंदे गटाच्या शिवसेनेसाठी हा निकाल धक्कादायक ठरला आहे. आमदार रमेश बोरणारे यांचे बंधू संजय बोरणारे यांना पराभव स्वीकारावा लागल्याने, स्थानिक पातळीवर आमदारांचे वजन अपेक्षेइतके निर्णायक ठरले नाही, हे वास्तव पुढे आले आहे. निवडणूक ही पक्षीयपेक्षा अधिक स्थानिक नेतृत्व आणि विश्वासावर लढली गेल्याचे यातून अधोरेखित होते. नगरसेवक निवडीत भाजपने ११ जागा जिंकत आघाडी घेतली असली तरी शिवसेनेचे १० नगरसेवक निवडून आले आहेत, तर भाजपासोबत आघाडी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ नगरसेवकही निवडून आले आहे.

Vaijapur News
Paithan Political News : पैठणला शिवसेना शिंदे गटाचा दणदणीत विजय

तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाचे खातेही उघडू शकलेले नाही. वैजापूरचा हा निकाल मपक्षापेक्षा चेहराफ ममोर्चेबांधणीपेक्षा विश्वासफ आणि मसत्ता नव्हे तर स्थानिक पकडफया घटकांचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल राजकीय पक्षांसाठी दिशादर्शक ठरणार, यात शंका नाही.

पती व पत्नीचा पराभव...

ठाकरे गटातून नुकतेच भाजपामध्ये आलेले प्रकाश चव्हाण हे व त्यांची पत्नी चित्रा चव्हाण या नगरसेवक पदासाठी उमेदवार होते. मात्र या दोघांचाही पराभव झाला आहे, तर त्या ठिकाणी दोन्ही शिवसेनेचे उमेदवार निवडून आले.

वैजापूरमध्ये बोरणारे कुटुंबाला दुहेरी धक्का

वैजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत आमदार रमेश बोरणारे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबातील दोन्ही प्रमुख उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. आमदार रमेश बोरणारे यांचे बंधू संजय बोरणारे हे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार होते, तर त्यांच्या भावजई छाया बोरणारे यांनी नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवली होती, मात्र मतदारांनी दोघांनाही नाकारत स्पष्ट संदेश दिला आहे.

नगराध्यक्ष आणि नगरसेवक अशा दोन्ही आघाड्यांवर झालेल्या या पराभवामुळे बोरणारे यांची शहरातील पकड सैल झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे हा निकाल केवळ वैयक्तिक पराभव न राहता आगामी राजकीय समीकरणावर परिणाम करणारा मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news