Gangapur Municipal Council : गंगापूर नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता

संजय जाधव यांचा २२५२ मताधिक्याने विजय
NCP Alliance
Gangapur Municipal Council : गंगापूर नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ताFile Photo
Published on
Updated on

The NCP is in power in the Gangapur Municipal Council

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा: गंगापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता प्रस्थापित केली. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय विठ्ठलराव जाधव यांनी भाजपचे उमेदवार प्रदीप सुधाकर पाटील यांचा २२५२ मतांनी पराभव केला.

NCP Alliance
Gambling Den : औरंगपुऱ्यात तनवाणीच्या जुगार अड्यावर पुन्हा छापा

संजय जाधव यांना ९७३९, तर प्रदीप पाटील यांना ७४८७ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाधव यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली.

नगरपरिषद सदस्य निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ नगरसेवक निवडून आले असून, भाजपचे ७, शिवसेना (उबाठा) गटाचा १, तर १ अपक्ष नगर- सेवक विजयी झाला आहे. त्यामुळे गंगापूर नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे.

NCP Alliance
Municipal Election : भावी नगरसेवकांची मंडप, बँड, रिक्षांसाठी धावपळ

या निवडणुकीत अभूतपूर्व मतदान झाले. नगराध्यक्षपदाच्या लढतीत एमआयएमचे शेख सोफियान शिरास यांना ९०६ मते, शिवसेनेच्या उमेदवाराला १३१० मते, तर काँग्रेसचे मोहसीन कबीर बागेस यांना १०३३ मते मिळाली.

खरी लढत मात्र राष्ट्रवादीचे संजय जाधव व भाजपचे प्रदीप पाटील यांच्यातच झाली. या निकालामुळे गंगापूरच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून, आगामी काळात नगरपरिषदेत पक्षाची निर्णायक भूमिका राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news