Children Vaccination : रुबेलाच्या नियंत्रणासाठी मनपाकडून लसीकरण

निवासी आश्रमशाळांसह मदरसामधील विद्यार्थ्यांना दिली जाणार लस : कमिशनर टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय
Children Vaccination
Children Vaccination : रुबेलाच्या नियंत्रणासाठी मनपाकडून लसीकरण File Photo
Published on
Updated on

Vaccination by the Municipal Corporation to control rubella

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा गोवर आजाराच्या समूळ उच्चाटनाकरिता तसेच रुबेला आजाराच्या नियत्रंणासाठी महापालिकेकडून शहरातील निवासी आश्रमशाळा व निवासी मदरसामधील ५ ते १५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी १५ ते ३० सप्टेंबरपर्यंत लसीकरण मोहीम राबवली जाणार असून, यासंदर्भात शुक्रवारी (दि.१२) अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कमिशनर टास्क फोर्स बैठक घेण्यात आली.

Children Vaccination
आदर्श शिक्षक पुरस्कार : सभागृहात टाळ्याः बाहेर लाथाबुक्की!

गोवरच्या समूळ उच्चाटनासाठी आणि रुबेला आजाराच्या नियंत्रणाकरिता महापालिका हद्दीतील निवासी आश्रमशाळा व निवासी मदरसामधील ५ ते १५ वर्षे वयोगटातील बालकांचे गोवर व रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कमिशनर टास्क फोर्स बैठक घेण्यात आली. यात १५ ते ३० सप्टेंबरपर्यंत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत शहरी भागातील १८ निवासी मदरसांमधील १७११ बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यासाठी शिक्षण विभाग लोकप्रतिनिधी, स्त्री रोगतज्ज्ञ संघटना, रोटरी क्लब, बालरोगज्ज्ञ संघटना, एकात्मिक बाल विकास प्रकल्प तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यासह एमजीएम महाविद्यालयाच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आश्रमशाळा व मदरसा यांच्या प्रमुखांचे, खासगी वाल रोगतज्ज्ञ संघटना व मनपा शिक्षक यांच्या सहकायनि मुलांचे लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

Children Vaccination
Sambhajinagar News ... अखेर कुशल कामांचा थकीत निधी मंजूर !

याबैठकीला वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डब्ल्यूएचओचे एसएमओ डॉ. मुजिब सय्यद, आरोग्य अधिकारी डॉ. अमरज्योती शिंदे, नियमित लसीकरण कार्यक्रम अधिकरी डॉ. उज्ज्वला भामरे, आरोग्य अधिकारी, डॉ. बी. डी. राठोडकर, मनपा शिक्षण अधिकारी, जनसंपर्क अधिकारी यांच्यासह स्त्री रोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय माने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयचे डॉ. रहेमान, एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयच्या बालरोग विभाग प्रमुख डॉ. माधुरी इंगाडे यांच्यासह सर्व संबंधित आरोग्य अधिकारी व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news