

Ideal Teacher Award : Fights outside the auditorium
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा विद्यार्थ्यांना संस्कार शिकवायचे आणि स्वतः मात्र आदर्श पुरस्कार सोहळ्यात हाणामारी करायची! संत एकनाथ रंगमंदिर येथे शुक्रवारी (दि.१२) झालेल्या जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा सुरू असतानाच बाहेर काही शिक्षकांनी असा लाजिरवाणा आदर्श ठेवला. आतमध्ये सन्मानाचा जल्लोष सुरू असताना बाहेर हाणामारीचा धिंगाणा घालत शिक्षकांनीच कार्यक्रमाला काळी छाया पाडली.
सूत्रांच्या माहितीनुसार, मपतसंस्था महामंडळफया व्हॉट्सअॅप ग्रुपवर गेल्या काही दिवसांपासून दोन शिक्षकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू होती. पुरस्कार सोहळ्यात आमनेसामने आल्यावर ती थेट हातघाईवर उतरली. एवढेच नव्हे तर कपडेफाड, ढकलाढकली अशी पराकोटी गाठली. शेवटी पोलिसांत धाव घेण्याची वेळ आली. उस्मानपुरा पोलिस ठाण्यात दोन्ही शिक्षक दाखल झाले.
वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालय गाठले, मात्र नंतर मकाही घडलेच नाहीफ म्हणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू झाला. शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी वाद झाल्याचे ऐकिवात आहे, पण कोणतीही तक्रार दाखल नाही, असे स्पष्ट केले. परंतु जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, शिक्षणाधिकारी चव्हाण व अश्विनी लाठकर विद्यार्थीहितासाठी योजना राबवत असताना काही शिक्षक मात्र हाणामारीच्या खेळात गुंतल्याने जिल्हाभर चर्चा रंगली आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ व शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चे जिल्हा शिक्षक पुरस्कार जिल्ह्यातील एकूण २६ शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे यांच्यासह आमदार विक्रम काळे, आमदार प्रशांत बंब, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची प्रमुख उपस्थिती होती.