Call Bombing : पैसे वसुलीसाठी कॉल बॉम्बिंगचा वापर; दर दोन मिनिटांना स्पॅम कॉल करून छळ

लेगन अॅपच्या ग्रेटमाइंड फिनटेक कंपनीसह एकावर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
Call Bombing
Call Bombing : पैसे वसुलीसाठी कॉल बॉम्बिंगचा वापर; दर दोन मिनिटांना स्पॅम कॉल करून छळfile photo
Published on: 
Updated on: 

use of call bombing for extortion; Harassment with spam calls every two minutes

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : खासगी कर्जाची थकबाकी वसुलीसाठी एका व्यक्तीचा कॉल बॉम्बिंगद्वारे भयंकर मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुगल प्ले स्टोअरवरील लेगन अॅपचा वापर करून संबंधित व्यक्तीला दर दोन मिनिटांना स्पॅम कॉल करण्यात आले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अॅप चालवणारी कंपनी ग्रेटमाइंड फिनटेक प्रा. लि. आणि वसुलीसाठी अॅपचा वापर करून छळ करणारा आरोपी कैलास पवार (४२, रा. श्रीकृष्णनगर, सुंदरवाडी) याच्यावर बुधवारी (दि.७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Call Bombing
Farmers end of life Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळ-नापिकीने त्रस्त दोन शेतकऱ्यांनी संपवले जीवन

सायबर पोलिस ठाण्याचे अंमलदार अमोल सोनटक्के यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बीड बायपास परिसरात राहणारे अर्जुन पवार (४४) यांनी सायबर पोलिसांत २५ फेब्रुवारी २०२६ रोजी तक्रार दिली होती. अर्जुन पवार आणि आरोपी कैलास पवार यांच्यात पैशांच्या थकबाकीवरून वाद होता. ही थकबाकी वसूल करण्यासाठी कैलास पवार याने गुगल प्ले स्टोअरवरून लेगन या अॅपचे सबस्क्रिप्शन घेतले होते. या अॅपच्या माध्यमातून फेब्रुवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यापासून अर्जुन पवार यांना दर २ मिनिटांना स्पॅम कॉल्स करून मानसिक त्रास दिला जात होता.

उपनिरीक्षक गणेश गिरी यांनी तांत्रिक तपास केला असता, हे अॅप ग्रेटमाइंड फिनटेक या कंपनीचे असल्याचे उघड झाले. मात्र, सबस्क्रिप्शनचे पैसे भरल्यावर ग्राहकाला पावती ग्रेटमाइंड लॉसूट व्हेंचर्स या दुसऱ्याच कंपनीच्या नावाने दिली जात होती. पेमेंट गेटवे (रॅझोरपे) आणि यूपीआयद्वारे गोळा होणारी रक्कम ग्रेटमाइंड फिनटेक कंपनीच्या कोटक महिंद्रा बँकेतील खात्यात जमा होत असल्याचे निष्पन्न झाले. हा व्यवहार संशयास्पद असल्याने पोलिसांनी बीएनएसएस कलम १०६ अन्वये हे बँक खाते गोठवले असून न्यायालयाला याची माहिती दिली आहे.

Call Bombing
Sambhajinagar News : आघाडीत बिघाडी; भाजप बंडखोराचाही लढण्याचा निर्धार

राज्यातील पहिलाच गुन्हा

अशा स्वरूपाचा राज्यातील पहिलाच गुन्हा असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे तपासात ग्रेटमाइंड फिनटेक कंपनी लेगन अॅपद्वारे दररोज सुमारे २ ते ३ लाख रुपये सब्स्क्रिप्शनद्वारे कमाई करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कंपनीचा पत्ता मालाड, मुंबई तर नोंदणी पत्ता अहमदाबाद आणि जीएसटीवर दीव दमनचा पत्ता असल्याने सर्व इन्कम टॅक्स चोरीचा प्रकार असल्याचेही समोर आले.

सायबर हल्ला व बेकायदेशीर कॉलिंग

हे अॅप कॉलर आयडी नसलेले नंबर वापरून ऑटोमेटेड कॉल जनरेट करत होते. दूरसंचार विभागाच्या डिनायल ऑफ सर्व्हिस या नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर सिमबॉक्स किंवा एसआयपी डिव्हाईसद्वारे हे कॉल्स केले जात होते. एका नागरिकाला मोबाईल वापरता येऊ नये इतके कॉल करून हा डिनायल ऑफ सर्व्हिस प्रकारचा सायबर हल्ला करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर हे करत आहेत.

लोन अॅप कंपन्यांकडूनही सर्रास वापर

इन्स्टंट लोन अॅप आणि फायनान्स कंपन्यांकडूनही वसुलीसाठी हीच मोडस ऑपरेंडी वापरली जात असल्याचे समोर आले आहे. कर्जदाराच्या फोन बुकमधील सर्व नंबर हॅक करून कर्ज वसुलीसाठी कॉल करून नातेवाईक व मित्रांना हैराण करण्याचे प्रकारही उघडकीस येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news