Farmers end of life Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळ-नापिकीने त्रस्त दोन शेतकऱ्यांनी संपवले जीवन

गव्हाली तांडा येथे नापिकी व दुष्काळाच्या विवंचनेत शेतकऱ्याने आयुष्य संपवले
Farmers end of life Chhatrapati Sambhajinagar
Farmers end of life Chhatrapati Sambhajinagar
Published on: 
Updated on: 

कन्नड/ छत्रपती संभाजीनगर - नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शासकीय योजनांचे रखडलेले अनुदान यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांने आपले जीवन संपवले. कन्नड तालुक्यातील गव्हाली तांडा येथील ६० वर्षीय शेतकरी विठ्ठल धुमा चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

विठ्ठल चव्हाण यांच्या कुटुंबात दोन मुले व तीन मुली आहेत. शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. त्यांच्यावर सोसायटीचे कर्ज होते. मागील तीन वर्षांपासून त्यांनी पंचायत समितीच्या योजनेतून विहीर खोदून तिचे बांधकाम पूर्ण केले होते. मात्र विहिरीच्या बांधकामाचे २ लाख रुपयांचे अनुदान अद्याप मिळाले नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अनुदानासाठी त्यांनी तीन वर्षांपासून पंचायत समितीच्या कार्यालयाच्या चकरा मारल्या; मात्र अद्याप बिल निघाले नसल्याने त्यांची आर्थिक अडचण कायम राहिली.

यावर्षी त्यांनी २ एकर क्षेत्रात मका पिकाची लागवड केली होती. मात्र पाण्याअभावी मका लवकर काढून त्या क्षेत्रात कांद्याची लागवड केली. विहिरीत उपलब्ध असलेले पाणी अवघ्या आठ दिवसांत संपल्याने कांदा पिकाला पाणी देता आले नाही. परिणामी संपूर्ण दोन एकर कांदा पिक करपून गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

दरम्यान, चव्हाण यांचे घरकुलही मागील दोन वर्षांपासून मंजूर आहे. मात्र पुढील बांधकामासाठी आवश्यक अनुदानाची रक्कम उपलब्ध न झाल्याने घरकुलाचे बांधकामही अपूर्ण अवस्थेत पडून आहे. एकीकडे सोसायटीचे कर्ज, दुसरीकडे नापिकी, विहिरीचे रखडलेले अनुदान आणि अपूर्ण घरकुल यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते.

या सर्व परिस्थितीमुळे विठ्ठल चव्हाण यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. सरकारने चव्हाण कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत करावी तसेच रखडलेले विहीर व घरकुलाचे अनुदान तत्काळ देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Farmers end of life Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar cylinder blast : भारतनगरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट

सोयगाव तालुक्यात दुष्काळाचा बळी

सोयगाव तालुक्यातील सावरखेडा येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. दुष्काळाच्या संकटात कर्जाचा बोजा वाढल्याने शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. विष प्राशन केल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चंद्रकांत सखाराम नवगिरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

Farmers end of life Chhatrapati Sambhajinagar
Sambhajinagar water wastage : पाणी बचतीचे आवाहन; उधळपट्टी सुरूच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news