Bogus Call Center : अमेरिकेच्या एफबीआयने मागितली कॉल सेंटरची माहिती

कॉलिंगसाठी व्हीपीएनचा वापर करून सुरक्षा यंत्रणा मेदली, मास्टरमाइंड फारुकीला १० दिवसांची पोलिस कोठडी
Bogus Call Center
Bogus Call Center : अमेरिकेच्या एफबीआयने मागितली कॉल सेंटरची माहितीFile Photo
Published on
Updated on

US FBI requests call center information

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा एमआयडीसी चिकलठाण्यात पोलिसांनी उद्ध‌वस्त केलेल्या बोगस कॉल सेंटर सिंडिकेटचे जाळे व्यापक असून आतापर्यंत अमेरिकेतील लोकांना टैक्स चोरीचा आळ घेऊन टोळीने हजारो डॉलर्स उकळले असल्याचे समोर आले आहे. व्हीपीएनचा वापर करून सुरक्षा यंत्रणांना गुंगारा दिला. डार्कनेटच्या तुटानोटा मार्फत ईमेल तयार करून त्यातून लोकांना कायदेशीर नोटीस पाठवून जाळ्यात ओढले जात होते.

Bogus Call Center
MSRTC : नवीन एसटी बसेसमध्ये ब्रेथ ॲनालायझर

दरम्यान, अमेरिकेतून महाराष्ट्र पोलिसांना ईमेल आला असल्याचे पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी गुरुवारी न्यायालयात सांगितले. एफबीआयने माहिती मागितली असून त्यांच्याकडून फसवणूक झालेल्या लोकांची यादीही लवकरच पोलिसांना प्राप्त होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, मास्टरमाइंड अब्दुल फारुख मुकदम शाह ऊर्फ फारुकी (४९, रा. जिन्सी, खासगेट) याला गोव्यातून अटक करून शहरात आणल्यानंतर गुरुवारी (दि.३०) न्यायालयात हजर केले. त्याला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Bogus Call Center
Vivah Muhurt : लग्नाळूसाठी गूड न्यूज, आठ महिन्यांत विवाहाचे ५६ मुहूर्त

अधिक माहितीनुसार, अमेरिकेतील नागरिकांना टॅक्स चोरी, लोन फॉडमध्ये नाव आल्याची भीती घालून त्यांच्याकडून गिफ्ट कार्डच्या माध्यमातून कोड रिडिम करून डॉलरची रक्कम बिटकॉइन आणि त्यानंतर रुपयात रूपांतरित करून लूट केली जात होती. याचा प्रमुख जॉन हा व्हच्र्युअली टोळीशी जोडलेला होता. इथे फारुकी प्रमुख होता. त्याला गुजरातचे भावेश चौधरी, भाविक पटेल, सतीश लाडे, वलय व्यास, अजय ठाकूर, मनोवर्धन चौधरी हे साथीदार होते. ११४ हुन अधिक नॉर्थ ईस्टच्या तरुण-तरुणींना कॉलिंगसाठी कामावर ठेवण्यात आले होते. अमेरिकन इंग्लिश बोलण्याचे प्रशिक्षणही दिले होते. मात्र, एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने मंगळवारी (दि.२८) रॅकेटचा पर्दाफाश करून ११४ जणांना ताब्यात घेतले होते.

यातील फारुकीच्या अटकेटनंतर त्याला पोलिस निरीक्षक गीता बागवडे, पीएसआय अमोल म्हस्के यांच्या पथकाने गुरुवारी न्यायालयात हजर केले. पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ, डीसीपी रत्नाकर नवले, प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

राष्ट्रीय सुरक्षेला धोका

टोळीने डार्कवेब फोरम्सवरून तुटानोटा ईमेल बर्नावले. व्हर्चुअल कॉल नोंदी आणि व्हीप-एिन/रिमोट सब्र्व्हर रिले लॉग्स आढळले आहेत. या तंत्रांचा वापर कॉल किंवा ईमेल्सचा मूळ स्रोत लपवणे आणि आंतरराष्ट्रीय सीमा पार करून संपर्क साधने आहे. ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांना लॅपटॉपचा आयपी शोधणे, तपास कठीण होतो. ओळख लपविण्यासाठी व्हीप-एनद्वारे दुसऱ्या देशातील सर्व्हर वापरण्यात आले. त्यामुळे ही गंभीर बाब असून राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो असे पोलिसांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news