

Good news, 54 Vivah Muhurt in eight months
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दिवाळीनंतर आस लागते ती तुळशी विवाहाची त्यानंतर लग्नसराईचा धुमधडाका सुरू होणार आहे. यंदा नोव्हेंबरपासून जुलैअखेरपर्यंत तब्बल ५६ विवाह मुहूर्त आहेत. लग्नाळूसाठी ही यंदा कर्तव्य आहे, असल्याचे पुरोहित प्रवीण कुलकर्णी यांनी सांगितले.
वैदिक परंपरेनुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी (देवशयनी) ते कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चातुर्मास पाळला जातो. यावर्षी भागवत एकादशी २ नोव्हेंबरला आहे. द्वाद-शीला श्रीकृष्ण यांच्याशी तुळशीचा विवाह लावण्यात येतो. तेव्हापासून वैवाहिक मुहूर्त काढले जाण्याची परंपरा आहे.
तुळशीचा विवाह कार्तिक शुक्ल द्वादशी २ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा ५ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. त्यानंतर विवाह सोहळ्यांना प्रारंभ होईल. एकादशीनंतर शुभ कार्यांना प्रारंभधार्मिक परंपरेनुसार, देवशयनी एकादशीपासून (६ जुलै) भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेत जातात. या काळात म्हणजेच चातुर्मासात विवाह व इतर शुभ कार्ये टाळली जातात. परंतु देवऊठनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू झो पेतून जागे होतात आणि तेव्हापासून सर्व शुभ कार्यांना परवानगी मिळते.
त्यामुळे नोव्हेंबरपासून लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. हिंदू धर्मात विवाहसंस्काराला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान आहे. विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे नव्हे, तर दोन कुटुंबांचे आणि दोन जीवांचे पवित्र बंधन. प्रत्येकाला इच्छा असते की, देव-देवतांच्या साक्षीने, मंत्रोच्चारांच्या मंगल स्वरात आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत आपला विवाह संपन्न व्हावा. कोणताही शुभ कार्य करताना पंचांगाचा आणि मुहूर्ताचा विचार केला जातो, आणि विवाहासाठी तर शुभ मुहूर्ताला विशेष महत्त्व असते.
असे आहेत मुहूर्त
हिंदू धर्मात विवाहसंस्काराला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान आहे. विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं नव्हे, तर दोन कुटुंबांचं आणि दोन जीवांचं पवित्र बंधन. ते पूर्णपणे तिथी शुभमुहूर्तावर व्हावे असेच सगळ्यांना वाटते.
नोव्हेंबर : २२, २३, २५, २६, २७, ३०
डिसेंबर : ४, ५ व ६ नंतर अस्त असल्याने तिथी नाही
फेब्रुवारी : ३, ५, ६, ७, ८, १०, ११, १२, २०, २२, २५, २६ सर्वाधिक मुहूर्त
मार्च: ५, ७, ८,१२, १४, १५, १६
एप्रिल २१, २६, २८, २९, ३०
मे: १, ३, ६, ७, ८, ९,१०,१३,१४
जून : १९, २०, २२, २३, २४, २० २७
जुलै : १, २, ३, ४, ७, ८, ९,