MSRTC : नवीन एसटी बसेसमध्ये ब्रेथ ॲनालायझर

मद्यपी कर्मचाऱ्यांवर विशेष लक्ष : ७ कर्मचाऱ्यांवर कारवाई
MSRTC
MSRTC : नवीन एसटी बसेसमध्ये ब्रेथ ॲनालायझर File Photo
Published on
Updated on

Breath analyzer in new ST buses

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा एसटी ही महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे. दररोज लाखो सर्वसामान्य नागरिक एसटीच्या से-वेचा लाभ घेतात. काही कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्यपान करून गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने एसटीने अचानक तपासणी करून ७ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. यापुढे नवीन बसमध्ये ब्रेथ अॅनालायझर ठेवण्यात येणार असून कर्तव्यावर जाण्यापूर्वीच चालक, वाहकांची मद्यतपासणी होणार आहे.

MSRTC
अतिवृष्टीची मदत : संभाजीनगर, जालन्यासाठी ८३६ कोटींचा निधी

प्रवाशांची सुरक्षा ही एसटी महामंडळाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. भविष्यात नवीन येणाऱ्या बसेसमध्ये चालकाच्या समोर ब्रेथ अॅनालिसिस यंत्र (अल्कोहोल तपासणीसाठी) बसविण्यात येणार असून, त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या मद्यपी चालकांना अटकाव होणार आहे. एसटीच्या सुरक्षा आणि दक्षता विभागाने मंगळवारी (दि. २८) राज्यभरातील सर्व विभागांतील चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांची अचानक तपासणी केली.

यात संशयास्पद ७१९ चालक, ५२४ वाहक आणि ४५८ यांत्रिक कर्मचारी अशा सुमारे १७०१ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत दोषी आढळलेल्या ७ कर्मचाऱ्यांवर दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. संबंधित कर्मचारी कर्तव्य बजावत असताना मद्यपान केल्याचे आढळून आले. त्यामध्ये ३ चालक आणि ४ यांत्रिक कर्मचाऱ्यांसह एकूण ७कर्मचारी निलंबित झाले आहेत.

MSRTC
Sambhajinagar Rain : छत्रपती सभाजीनगर तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार

कठोर कारवाईचा इशारा या घटनेनंतर सुरक्षा आणि दक्षता खात्याने भविष्यात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यापुढे देखील अशा प्रकारची अचानक आणि वारंवार तपासणी मोहीम संपूर्ण महामंडळात राबविण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news