

Uno Minda to invest Rs 210 crore in Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उनो मिंडा कंपनीने छत्रपती संभाजीनगरात २१० कोटी रुपये गुंतवणूकीची घोषणा केली आहे. इथल्या प्रकल्पाव्दारे कंपनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी (ईव्ही) कास्टिंग पार्ट्स तयार करणार आहे. २०२६-२७ पासून पुढील पाच वर्ष टप्या-टप्याने ही गुंतवणूक केली जाणार असून, वार्षिक उत्पादन क्षमता ३,६२९ मेट्रिक टनपर्यंत वाढवणे कंपनीचे उद्दीष्ट आहे.
गेल्या काही महिन्यात संभाजीनगर येथील औद्योगिक वसाहतीत टोयोटा, अथर, जेएसडब्ल्यूसह इतर काही मोठ्या कंपन्यांनी ईव्ही वाहन उत्पादनासाठी गुंतवणूक जाहिर केली असून, त्या कंपन्यांना जमिनीही मिळाली आहे. यामुळे संभाजीनगर शहराची इलेक्ट्रिक मोबिलिटी हबकडे वाटचाल सुरु आहे. इथे उत्पादन होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी आता मोठ्या प्रमाणावर ल्युमिनियमवर आधारीत स्ट्रक्चरल आणि थर्मल सूटे भाग लागणार आहेत.
या ईव्ही भागांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी उनो मिंडाने संभाजीनगर येथे त्यांच्या कास्टिंग विभागासाठी एक नवीन उत्पादन सुविधा उभारण्याचे जाहीर केले आहे. १९ जून २०२५ रोजी संचालक मंडळाच्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. इथल्या सुविधेसाठी कंपनी सुमारे २१० कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.
पुढील पाच वर्ष टप्याटप्याने गुंतवणूकीसाठी कंपनी अंतर्गत जमा आणि मुदत कर्जाच्या मिश्रणाद्वारे प्रकल्पासाठी वित्तपुरवठा करण्याची योजना आखत आहे.
या प्रकल्पामध्ये अंदाजे २१० कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्यात येणार असून पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. यासाठी अर्थपुरवठा हा अंतर्गत पैशांसह कर्जाच्या माध्यमातून उभारला जाणार आहे. पहिल्या टप्प्याचे उत्पादन हे आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसर्या तिमाहीत सुरु होण्याची अपेक्षा आहे.
या गुंतवणूकीतून कंपनीच्या दीर्घकालीन अशा स्थानिक उत्पादन क्षमता वाढवण्यासाठीची वचनबध्दता अधोरेखित होत असून त्यासह स्थानिकांच्या प्रयत्नांना सहकार्य करुन वेगाने वाढणार्या इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रातील गतीशीलतेत पुढे राहण्यावर भर दिला जाणार आहे.
अधिक माहिती :
गुंतवणूकः २१० कोटी रुपये.
उत्पादनः
इलेक्ट्रिक वाहन (एत) कास्टिंग पार्ट्स.
क्षमताः
३,६२९ मेट्रिक टन वार्षिक उत्पादन क्षमता.
सुरुवातः
२०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे.
स्थानः
संभाजीनगर (औरंगाबाद), महाराष्ट्र.
कंपनी:
युनो मिंडा ही एक प्रमुख ऑटोमोटिव्ह घटक पुरवणारी कंपनी आहे, जी २० पेक्षा जास्त उत्पादनांच्या श्रेणींमध्ये काम करते, असे कंपनीच्या वेबसाइटवर नमूद आहे. उद्दिष्ठः
नवीन सुविधा ईव्ही भागांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आहे, विशेषतः जएच् कडून असे एका अहवालात म्हटले आहे.