

Gambling, drug abuse, and hooliganism have increased tremendously in Mukundwadi
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुकुंदवाडीत जुगार, नशेखोरी, गुंडगिरी प्रचंड वाढली आहे, यापूर्वीही अनेक गंभीर घटनांमुळे या भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला होता. विशेषतः पोलिस ठाण्यापासून काही अंतरा वरच नशेखोर, जुगारीचे अड्डेही होते.
मात्र गुरुवारी रात्री सिग्नलजवळ असलेल्या चिकन शॉपसमोर हत्याकांड घडल्यानंतर पोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी कठोर भूमिका घेत रस्त्यालगत सर्व्हिस रोडवर अतिक्रमण करून थाटलेल्या छोट्या हॉटेल्स, मासे, मटन विक्रेत्यांच्या टपऱ्यांवर थेट बुलडोजर चालविला. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
शहरात अनेक भागांत अतिक्रमण केलेल्या जागांवर अवैध दारू विक्री, जुगार, अवैध धंदे चालविले जायचे. अनेक जण छोटी हॉटेल्स थाटुन अवैधपणे दारू पिणार्यांना जागा उपलब्ध करून देतात. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडूनही कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही.
तर दुसरीकडे नशेखोर अशा ठिकाणीच गुन्हेगारी कृत्याचे धडे गिरवत असल्याचेही यापूर्वी समोर आलेले आहे. शहरातील मोकळी मैदानेही नागरिकांना धोकादायक वाटत आहेत, त्यामुळे गुन् हेगारी कृत्यात वारंवार सहभागी असणाऱ्या आणि जागेवर अतिक्रमण करून बसलेल्यांवर आता थेट बुलडोजर कारवाई होणार असल्याचे संकेत मुकुंदवाडीतील कारवाईवरून पोलिसांनी दिले आहेत. स्वतः पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी अतिक्रमण कारवाई