Uddhav Thackeray | ''तुम्ही आम्हाला मिठी मारु इच्छिता, आम्ही मारु, पण...;" उद्धव ठाकरे असे कोणाला म्हणाले?

छत्रपती संभाजीनगरमधील शिवसंकल्प मेळाव्यात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Uddhav Thackeray Shiv sankalp Melava Chhatrapati Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगरमधील शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी संबोधित केले. (X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

आगामी विधानसभा निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. यामुळे लाचारी, गद्दारांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटाला दिला आहे. त्यांनी आज शनिवारी छत्रपती संभाजीनगरमधील शिवसंकल्प मेळाव्यात (Shiv sankalp Melava) बोलताना सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. मला काहीतरी पाहिजे म्हणून काहीजण भाजपात जात आहेत. तुम्ही आम्हाला मिठी मारु इच्छिता. आम्ही मिठी मारु. पण विश्वासघाताने पाठीत वार करत असाल, तर आम्ही तुमचा कोथळा काढू. तो काढावा लागेल, असा इशाराही ठाकरेंनी दिला.

'...तर आम्ही सरकारच्या ठरावाला पाठिंबा देऊ'

आरक्षणाच्या मुद्यावर ठाकरेंनी आपली भूमिका जाहीर केली. तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊन बसा. जर टक्केवारी वाढवण्याची गरज असेल, तर विधानसभेत ठराव आणा. शिवसेना त्याला पाठिंबा देईल. लोकसभेतही पाठिंबा देऊ. हे मी आज जाहीर करतो. पण मराठा आणि ओबीसींना एकमेकांच्या उरावर बसवताय. त्यांना कायद्याच्या चौकटीत झुलवत राहताय, हे पाप करु नका, असेही ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray Shiv sankalp Melava Chhatrapati Sambhajinagar
Shiv Sena UBT | आत्मविश्वास वाढलेल्या ठाकरे सेनेचे नेतृत्व कुणाकडे?

'संभाजीनगरचा विजय हा चोरुन मिळवलेला विजय'

कोकण, संभाजीनगरचा पराभव जिव्हारी लागल्याची खंतही ठाकरेंनी व्यक्त केली. चंद्रकांत खैरे हार असो वा जीत, ते शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. माझ्या पक्षाच नाव, पक्ष, चिन्ह चोरुन संभाजीनगरमध्ये विजय मिळवला आहे. संभाजीनगरचा विजय हा चोरुन मिळवलेला विजय असल्याचा घणाघातही त्यांनी केला. काही लोकांनी चुकीने धनुष्यबाण चिन्हावर मतदान केले. अजूनही लोकांमध्ये धनुष्यबाण, मशाल चिन्हांमध्ये संभ्रम असल्याचेही त्यांनी मान्य केले. जे शिवसेनेसोबत झाले तेच शरद पवारांच्या पक्षासोबतही झाल्याचे त्यांनी नमूद केले.

'महिलांसाठी योजना आणल्या, पण युवकांचा काय?'

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरही त्यांनी भाष्य केले. महिलांना मतदानाला आकर्षित करण्यासाठी ह्या योजना आणल्या आहेत. आता जाहीर केलेल्या योजना ह्या त्यांची पापं लपवण्यासाठी आहेत. महिलांसाठी योजना आणल्या, त्याचे स्वागतंच पण युवकांचा काय? असा सवालही ठाकरेंनी केला. युवकांना रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला पळवले. सरकारच्या पापांचा घडा भरलाय. त्यामुळे योजनांची फुंकर मारतायेत, अशी टीकाही त्यांनी केली.

Uddhav Thackeray Shiv sankalp Melava Chhatrapati Sambhajinagar
Mazhi Ladki Bahin Yojana |'माझी लाडकी बहीण योजना': अर्ज प्रक्रिया आणखी सुलभ; जाणून घ्या

'योजनांची अतिवृष्टी, पण अंमलबजावणीचा दुष्काळ'

शेतकऱ्यांची थकबाकी माफ करा, नंतर वीजबिल माफ करा, अशी मागणी त्यांनी केली. योजनांची अतिवृष्टी होत आहे. पण अंमलबजावणीचा दुष्काळ असल्याची टीकाही त्यांनी केली.

भाजपला धक्का, राजू शिंदेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

दरम्यान, आजच्या शिवसंकल्प मेळाव्यादरम्यान भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरेंनी राजू शिंदे यांच्या हातात शिबबंधन बांधले. राजू शिदे यांच्यासह १८ जणांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news