Ghati Hospital : घाटीने मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या तरुणाला केले ठणठणीत

मेंदूत रक्तस्त्राव अन् गंभीर संसर्ग, तीन महिने व्हेंटिलेटरवरील झुंज यशस्वी
sambhajinagar news
घाटीने मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या तरुणाला केले ठणठणीतfile photo
Published on
Updated on

Bleeding in the brain and severe infection, three months on a ventilator was successful ghati hospital

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुंबईवरून प्रवास करून परतलेल्या एका ३२ वर्षीय तरुणाला गंभीर अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रक्तातील प्लेटलेट्स कमी, तपासणी करतानाच बेशुद्ध पडलेल्या अन् मेंदूत रक्तस्त्राव झालेल्या या तरुणावर तब्बल तीन महिने व्हेटिलेटरवर उपचार सुरू होते. मेडिसीन विभागातील तज्ज्ञ, अनुभवी डॉक्टरांच्या यशस्वी औषधोपचाराच्या बळावर आजाराशी लढा देत हा तरुण ठणठणीत बरा झाल्याने सोमवारी (दि.२०) त्यास सुटी देण्यात आली.

sambhajinagar news
Power Outage : सातारा-देवळाईकरांची रात्र अंधारात; प्रशासनाचे दुर्लक्ष

घाटीतील अपघात विभागात ९ एप्रिल रोजी या तरुणास अत्यंत नाजूक अवस्थेत दाखल करण्यात आले होते. तो ताप, थंडी आणि डोकेदुखीच्या त्रासाने ग्रस्त होता. रक्तातील प्लेटलेट्स कमी आणि तपासणी सुरू असतानाच रक्तदाब कमी होऊन बेशुद्ध पडल्याने तात्काळ कृत्रिम श्वासोंच्छवासासाठी इंट्यूबेट केले. गंभीर ईसीजीमुळे त्याला डीसी शॉक द्यावा लागला. सिटीस्कॅनमध्ये मेंदूत ८ मिमी जाडीचा रक्तस्त्राव असल्याचे आढळून आले होते. फुफ्फुसाचा गंभीर जंतुसंसर्ग व चेतासंस्थेचा संसर्ग झाल्याने विविध विभागांच्या समन्वयाने उपचार सुरू होते.

प्लेटलेट्स सातत्याने कमी होत असल्याने आवश्यक रक्तघटक चढवण्यात आले. प्रदीर्घ व्हेंटिलेटर सपोर्टची गरज पाहून रुग्णावर ट्रॅकीओस्टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली. घाटीतील वैद्यकीय व नर्सिंग पथकाच्याप्रयत्नामुळे रुग्णाची प्रकृती सुधारली आणि त्याला यशस्वीरीत्या व्हेंटिलेटरवरून बाहेर काढण्यात आले. अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. प्रशांत गजभारे यांच्या निगराणीत रुग्णाचे सखोल उपचार नियोजन करण्यात आले.

sambhajinagar news
Garbage Collection Company : अवघ्या तीन महिन्यांतच कचरा संकलन कंपनीचे काम थांबण्याचे संकेत

मेडिसीन डॉक्टर, स्टाफकडून अखंड सेवा

या रुग्णाच्या दीर्घकालीन उपचार काळात डॉ. लामत नूर, डॉ. मसरत खान, डॉ. अझहर पटेल, डॉ. शुभम घोघळ, डॉ. यशराज गरुड तसेच डॉ. श्रीवत्स ईश्वरन, डॉ. यशश्री खंदारे, डॉ. शोएब मुज्तबा, डॉ. विकास सिंह, डॉ. सागर पवार, डॉ. अनिकेत गाडेकर, डॉ. वैभव कवठेकर, डॉ. सर्वज्ञ भारसाकळे, डॉ. ईश्वर एडके, डॉ. वीणा मालानी यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

रुग्णाच्या कुटुंबीयांचे सहकार्य

या संपूर्ण उपचार प्रवासात रुग्णाच्या आई-वडील, कुटुंबीयांनी या कठीण काळात डॉक्टरांवर विश्वास, सहकार्य व मानसिक पाठबळ हे उपचारासाठी मोलाचे ठरले. तसेच एमआयसीयू व वॉर्डमधील नर्सिंग स्टाफने दिलेली अखंड, रुग्णकेंद्रित सेवा अत्यंत प्रशंसनीय ठरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news