Vaijapur News : महसूल पथकाने पकडलेली वाळूची दोन वाहने पळवली

३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोन जणांविरुध्द गुन्हे दाखल
vaijapur crime news
महसूल पथकाने पकडलेली वाळूची दोन वाहने पळवलीFile photos
Published on
Updated on

Two sand trucks seized by the revenue team were recovered

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : महसूल पथकाने पकडलेली वाळूची वाहने पोलिस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आली; मात्र ही वाहने पोलिस पाटील यांना धमकावून पळवून नेल्याची घटना तालुक्यात घडली. या प्रकारामुळे उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जन्हाड यांनी कडक कारवाईचे आदेश देत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिल्यानंतर दोन जणांविरुद्ध पोलिसांत स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आली आहेत.

vaijapur crime news
Crime News : दुकाने फोडणारा आरोपी जेरबंद

जळगावचे पोलिस पाटील राजू भडाईत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिनी टिप्परचा चालक दिनेश शिंदे (रा. रोटेगाव) याच्याविरुद्ध बेकायदा शासनाच्या ताब्यातील पकडलेले वाळूचे वाहन दमदाटी करून पळवून नेल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. या कार्यवाहीत १५ लाख रुपये किमतीची मिनी टिप्पर व चार हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळू असा सुमारे १५ लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

तर राजू भडाईत यांनीच दिलेल्या फिर्यादीवरून गणेश पंजाब गायकवाड (रा. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. या कारवाईत १५ लाख ५० हजार रुपये किमतीचा मिनी टिप्पर व आठ हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळू असा १५ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

vaijapur crime news
PM Shri Yojana : ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नवी ज्ञानक्रांती

परवाना निलंबनाचा दणका

उपविभागीय अधिकारी अरुण जन्हऱ्हाड यांनी संबंधित वाहन मालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिताची संबंधित कलम तसेच महाराष्ट्र गौण खनिज कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. शासकीय कामात अडथळा आणणे आणि सार्वजनिक मालमत्तेची चोरी केल्याबद्दल गुन्हे नोंदवण्यात आले. संबंधित वाहनांचे परवाने निलंबित करून वाहने जप्त ठेवण्याबाबत आरटीओला स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची सविस्तर माहिती जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आली असून, दोन दिवसांच्या आत अनुपालन अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संयुक्त पथकांमार्फत कारवाई

वाळूमाफियांच्या वाढत्या दादागिरीला लगाम घालण्यासाठी महसूल, पोलिस आणि परिवहन विभाग यांच्यात समन्वय वाढवण्यात आला आहे. संयुक्त पथकांमार्फत कठोर आणि वेगवान कारवाईची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी अरुण जऱ्हाड यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news