PM Shri Yojana : ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नवी ज्ञानक्रांती

आडूळ येथील जि. प. प्रशालेत अत्याधुनिक डिजिटल क्लासरूम
PM Shri Yojana
PM Shri Yojana : ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नवी ज्ञानक्रांतीfile photo
Published on
Updated on

A new knowledge revolution for rural students

कडेठाण, पुढारी वृत्तसेवा : आडूळ येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्रशालेत पीएम श्री योजनेअंतर्गत अत्याधुनिक डिजिटल क्लासरूम आयडियल सेंटर उभारण्याचे काम पूर्ण झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही मोठी शैक्षणिक झेप मानली जात आहे.

PM Shri Yojana
Accident News : कारला भरधाव वाहनाची धडक; एक ठार, दोन जखमी

अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण तयार झालेल्या या लॅबमधून विद्यार्थ्यांना लवकरच डिजिटल शिक्षण दिले जाणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान पध्दतीने उभारण्यात आलेल्या या लॅबला आयडियल सेंटर असे नांव देण्यात आले असून नवीन डिजिटल क्लासरूम मध्ये मोठी इंटरअॅक्टिव्ह स्क्रीन, २४ विद्यार्थ्यांसाठी आधुनिक टॅब, डेस्कटॉप रॅक माऊंट सिस्टम, मोबाईल नेटवर्क सुविधा, यूएसबी कीबोर्ड व माऊस, माइकसह हेडफोन, वॉल स्पीकर, वायरलेस मायक्रोफोन हेडसेट, मॅट, पियूपी, एलईडी लाईट अशा अत्याधुनिक साधन सामग्रीची उपलब्धता करून देण्यात आल्या आहेत. या लॅबमध्ये एकाच वेळी २४ विद्यार्थी डिजिटल पद्धतीने शिक्षण घेऊ शकणार आहेत.

PM Shri Yojana
Crime News : दुकाने फोडणारा आरोपी जेरबंद

पाचवी ते आठवी पर्यंतचा संपूर्ण शालेय अभ्यासक्रम तसेच स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आता अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांना करता येणार आहे. डिजिटल क्लासरूम उभारणाऱ्या संस्थेकडून शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांना एक दिवसाचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी नियमित अध्यापन सुरू होईल. डिजीटल क्लासरूम उभारणारी आडूळ येथील पीएम श्री जिल्हा परिषद शाळा ही पैठण तालुक्यातील दुसरी शाळा आहे.

ग्रामीण भागातील मुलांनाही शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे दर्जेदार डिजिटल शिक्षण मिळावे हा आमचा ध्यास आहे. ही डिजिटल क्लासरूम म्हणजे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उघडलेले ज्ञानद्वार आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विषय अधिक सोपे, रंजक आणि प्रभावी पद्धतीने समजतील. यामुळे विद्यार्थ्यांची शिकण्याची गती वाढेल आणि त्यांचा आत्मविश्वास अधिक बळकट होईल.
ज्योती मादनकर, मुख्याध्यापिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news