Sambhajinagar Crime : बँक ग्राहक सेवा केंद्राला फसवणाऱ्या टोळीतील दोघे जेरबंद

३ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त, सायबर पोलिसांची कारवाई
Sambhajinagar Crime
Sambhajinagar Crime : बँक ग्राहक सेवा केंद्राला फसवणाऱ्या टोळीतील दोघे जेरबंद File Photo
Published on
Updated on

Two arrested in gang that defrauded bank customer service center

लासूर स्टेशन, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील अनेक बँक ग्राहक सेवा केंद्र (सीएसपी सेंटर) चालकांना अडचणीची थाप मारून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोघांना ग्रामीण सायबर पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून कारसह ३ लाख ३७ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. राहिल युनुस शेख (३७, रा. नाशीक), प्रवीण चंपालाल वैष्णव (४७, रा. सिन्नर, नाशिक) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.

Sambhajinagar Crime
Sillod Crime : हॉटेलच्या काउंटरमधून ७४ हजार लांबवले

ही टोळी बँक ग्राहक सेवा केंद्र चालकांना तातडीने रुग्णालयाचे बिल किंवा इतर पेमेंट भरायची थाप मारायचे. नातेवाईक तत्काळ तुमच्या खात्यावर ऑनलाईन पैसे पाठवणार असल्याचे सांगायचे त्यानुसार तेथील क्यूआर कोड किंवा फोन पे वर पैसेही पाठवायचे. त्याच दरम्यान सेवा केंद्रातील सदस्य तेथून ५० ते ८० हजार रुपये रोख घेऊन निघून जायचे.

काही वेळातच सीएसपी चालकाला अनोळखी नंबरवरून फोन करून तुमच्या खात्यात चुकून पैसे जमा झाले आहेत असे सांगून सायबरमध्ये तक्रार नोंदवायची व ते पैसे न्यायालयीन प्रक्रियेद्वारे परत मिळवायचे. अशा प्रकारची फसवणूक श्रीरामपूर, संगमनेर, जालना, जळगाव, मुक्ताईनगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा तसेच मध्यप्रदेश राज्यातही केली आहे. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव पोळ, गंगापूर, ढोरकीन आणि वेरूळ परिसरातील सीएसपी सेंटरवरही केली आहे. या प्रकरणी रांजणगाव पोळ (ता. गंगापूर) येथील राजू कचरु कुकलारे यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून या टोळीतील दोघांना ताब्यात घेतले.

Sambhajinagar Crime
Sanjay Shirsat : माझ्या लाडक्या पोपटाची वाचा गेली

पाठलाग करून केली अटक

या टोळीतील दोन सदस्य जळगाव जिल्ह्यात असल्याची माहिती मिळताच, सायबर पोलिसांनी मुक्ताईनगर परिसरातून वरील दोघांना पाठलाग करून राहिल शेख, प्रवीण वैष्णव या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कारसह सुमारे ३ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनायकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय देशमुख, विजयसिंग जोनवाल, निशा बनसोड, कैलाश कामठे, संतोष तांदळे, मुकेश वाघ, दत्ता तरटे, योगेश मोईम व इतर सहकाऱ्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news